शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘अभद्र’ युतीवर आघाडीची चुप्पी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:33 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा राज्यपातळीवर सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना - भाजपाची युती झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना किंवा भाजपा पक्षासोबत केलेली युती तोडावी, असे आदेश आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले होते. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही ‘अभद्र’ युती असल्याने ती तोडली जाईल, असेही सांगण्यात आले होते; परंतु, जिल्हा पातळीवर तशा प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नाहीत. परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला बाजूला ठेवून भाजपाला सत्तेत भागिदार बनविले. तर परभणी पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसने चक्क देशपातळीवर एक नंबरचा राजकीय शत्रू असलेल्या भाजपासोबत युती करुन शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अभद्र युती केली आहे. ही अभद्र युती तोडण्यासंदर्भात जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांना राज्य पातळीवरुन कोणताही निरोप मिळाला नसल्याचे समजते. त्यामुळे जवळपास दोन वर्षापासून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अभद्र युतीचा संसार गुण्या-गोविंदाने सुरु आहे. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असली तरी युती तोडलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपावर टीका करताना स्थानिक पातळीवर केलेली तडजोड जिल्ह्यातील कार्यकर्ते कसे विसरतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही सभांमधून भाजपाचा भाषणामधून खरपूस समाचार घेतला आहे; परंतु, स्थानिक पातळीवरील अभद्र युतीसंदर्भात त्यांनीही चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते गोंधळले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी परभणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थामधील अभद्र युती संपुष्टात येते की देश व राज्य पातळीवर वैचारिक मतभेद कायम ठेवून, स्थानिक पातळीवर तडजोड कायम ठेवली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliticsराजकारणElectionनिवडणूक