शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

परभणी : वर्षभरात ५५ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:40 IST

निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत ५५ हजार ५७९ नवीन मतदारांची नोंद झाली असून २ व ३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी नवमतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत ५५ हजार ५७९ नवीन मतदारांची नोंद झाली असून २ व ३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी नवमतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीेने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात मे २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ५५ हजार ५७९ नवीन मतदार वाढले आहेत. २३ व २४ फेब्रुवारी असे दोन दिवस नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात २०२, परभणी २२३, गंगाखेड २४० आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात २५५ असे ९२० मतदार वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अखेरची संधी म्हणून ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नाव नोंदणी करण्याकरीता २ व ३ मार्च रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी प्रत्येक ठिकाणी बीएलओंची उपस्थिती राहणार आहे. या संदर्भात राजकीय पक्षांनाही माहिती देण्यात आली असून इच्छुकांनी आपली नाव नोंदणी संबंधित मतदान केंद्रावर करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत ते केंद्रनिहाय या संदर्भात आढावा घेतील. त्यानंतर केंद्रावर राहिलेल्या त्रुटींची पूर्तता केली जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी मतदारांना १९५० या क्रमांकावर फोन करुन आपल्या नावाची खात्री करता येणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ँ३३स्र://६६६.ल्ल५२स्र.्रल्ल/्रल्लीि७.ँ३े’ या संकेतस्थळावरही नाव नोंदणी करणे किंवा मतदार यादीमधील नावाची खात्री करता येणार आहे.चार विधानसभा मतदारसंघात १३ लाख ७५ हजार मतदार४जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात छायाचित्रासह १३ लाख ७५ हजार ४७८ मतदारांची सद्यस्थितीत संख्या आहे. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४५ हजार १२७, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ३ लाख ८३ हजार ८२७, परभणी विधानसभा मतदारसंघात २ लाख ९९ हजार १८३ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४७ हजार ३४१ मतदारांचा समावेश आहे. या चारही विधानसभा मतदारसंघात १५१ मतदारांनी मतदार ओळखपत्रासाठी त्यांचे छायाचित्र काढलेले नाही. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११० मतदार पाथरी विधानसभा मतदारसंघात आहेत.कॉंग्रेसच्या आक्षेपावर ८ मार्चपर्यंत उत्तर देणार४जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात ५१ हजार ९६० मतदारांची दुबार नावे आल्याची तक्रार कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाच्या तक्रारीची पडताळणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. याबाबत चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. ८ मार्चपर्यंत कॉंग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या तक्रारी संदर्भातील माहिती देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. निवडणूक विभागाने आतापर्यंत २२ हजार दुबार नावे यादीतून वगळली असल्याचे त्यांनी सांगितले.३ हजार अपंग मतदार४जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात पूर्वी ९४२ अपंग मतदार होते. प्रशासनाच्या जनजागृती मोहिमेनंतर सध्या २ हजार ९५० अपंग मतदारांची संख्या झाली आहे. शिवाय स्त्री-पुरुष प्रमाण प्रति हजार २ ने वाढले असून ते ९२२ वरुन ९२४ झाले आहे. चार मतदारसंघात १५१ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११० मतदार पाथरी मतदारसंघात आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक