शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मनपाच्या उत्पन्नात २ कोटी रुपयांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:12 IST

शहरातील मोबाईल टॉवर धारकाकडून वसुली करण्यासाठी एजन्सी नेमल्याने मनपाच्या उत्पन्नात भर पडली असून या एजन्सीमार्फत रिलान्यस जिओ कंपनीकडून २ कोटी ६१ हजार २५० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मोबाईल टॉवर धारकाकडून वसुली करण्यासाठी एजन्सी नेमल्याने मनपाच्या उत्पन्नात भर पडली असून या एजन्सीमार्फत रिलान्यस जिओ कंपनीकडून २ कोटी ६१ हजार २५० रुपये वसूल करण्यात आले आहेत.शहरात १०७ मोबाईल टॉवर असून टॉवर उभारण्यासाठी मनपाची परवानगी लागते. तसेच शहरात आॅप्किटल केबल टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते. महापालिकेमार्फत टॉवर उभारणीचा परवाना, खोदकामाचे नाहरकत प्रमाणपत्र देताना शुल्क आकारणी तसेच दरमहा भाडे आणि कराची रक्कम वसूल केली जात होती. मात्र ही रक्कम जुन्या दरानेच आकारली जात असल्याने मनपाला नुकसान सहन करावे लागत होते.या पार्श्वभूमीवर आयुक्त रमेश पवार यांनी मोबाईल कंपन्यांकडून वसुली करण्यासाठी निश्चित धोरण आखले. या अंतर्गत अहमदनगर येथील मे. सुमन इन्फ्रा सर्व्हिेसेस ही एजन्सी नियुक्त केली. जानेवारी २०१९ पासून एजन्सीने काम सुरू केले आहे. त्यानुसार रिलायन्स जिओ कंपनीला ८ कि.मी. ओएफसी केबल टाकण्यासाठी नवीन दराने आणि जीएसटीच्या रकमेसह २ कोटी ३३ लाख ८३ हजार ३९३ रुपयांचे मागणी बिल सादर केले. त्यावर महापालिका ठाम राहिली. रिलान्यस जिओ कंपनीने त्यास मंजुरी दिली असून नुकतेच महापालिकेला २ कोटी ६१ हजार २५० रुपयांचा भरणा केला. जीएसटीची रक्कम जीएसटी कार्यालयास जमा केल्याचे प्रमाणपत्रही मनपाला सादर केले. यापूर्वी याच कामासाठी मनपाला केवळ ७० लाख रुपये मिळत होते. वाढीव शुल्काने वसुली केल्यामुळे २ कोटी ६१ हजार रुपयांची भर मनपाच्या उत्पन्नात पडली आहे. तसेच टॉवरच्या कराचीही नवीन दराने मागणी केली असून ती मागणीही कंपनीने मंजूर केल्याची माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली.कराचे नवीन धोरण४मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी कर वसुली संदर्भात नवीन धोरण आखले आहे. त्यानुसार वसुली केली जात आहे.४मोबाईल टॉवर संबंधी कामे करण्यासाठी ४६ पानाचे अद्यावत माहिती पुस्तक तयार करण्यात आले आहे.४त्यात टॉवरचे सर्वेक्षण, शासन निर्णयानुसार बांधकाम परवाना, कर संकलन, ओएफसीचे मागणीपत्रक, परवाना शुल्क आदींचा समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका