शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निवडणूक परवान्यांसाठी एक खिडकी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:20 IST

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, या काळात काढावयाच्या विविध परवान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, या काळात काढावयाच्या विविध परवान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारासाठी विविध परवाने घ्यावे लागतात़ हे परवाने प्राप्त करून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या कार्यालयात संपर्क साधावा लागतो़ ही बाब लक्षात घेऊन कमी वेळेत तात्काळ परवाने मिळावेत, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़जिल्हा कचेरीच्या पहिल्या मजल्यावर हा विभाग सुरू झाला असून, त्यात चौक सभा व सर्व प्रकारच्या जाहीरसभा, सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे लावणे, खाजगी जागेवर जाहिरात फलक लावणे (कटआऊट वगळून), प्रचार वाहनांची परवानगी, प्रचार कार्यालयाची परवानगी, हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविणे, ध्वनिक्षेपकाची परवानगी, निवडणूक रोड शो, रॅली, केबल जाहिरात परवानगी आदी ९ प्रकारचे परवाने या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत़ उमेदवारांचे अर्ज सकाळी ९ ते दुपारी ३ या काळात स्वीकारले जाणार असून, कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तात्काळ परवाना दिला जाणार आहे़ तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषदांचे ना हरकत प्रमाणपत्र त्याच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात एक विस्तार अधिकारी आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील जबाबदार प्रतिनिधी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत उपलब्ध ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़ त्याचप्रमाणे मनपा आयुक्तांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी एक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षात प्रतिनियुक्त करावा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रतिनिधीही या ठिकाणी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक