शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

परभणी : नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:44 IST

परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे रविवारपासून नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी नृ. : परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे रविवारपासून नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला.रविवारी पहाटे श्रींची महापूजा झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी गाथा भजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. दुपारी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे पोखर्णी फाटा येथे आगमन झाले. यावेळी तरुणांनी मोटारसायकल रॅलीद्वारे त्यांचे स्वागत केले. ढोल-ताशा, फटाक्यांची आतषबाजी करीत समाधान महाराज शर्मा यांची मिरवणूक काढली. पोखर्णी फाटा ते मंदिर मार्गावर विविध ठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. मुख्य व्यासपीठावर ग्रंथपूजा झाल्यानंतर नृसिंह पुराण कथेला प्रारंभ झाला. नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यात यावर्षी पहिल्यांदाच नृसिंह पुराण कथा होत आहे. या संगीत नृसिंह पुराण कथेत शिवम देवडकर, शिवाजी आर्दड, गोविंद नाईकवाडे, समाधान चोपडे, सिद्धेश्वर मुळे यांची साथसंगत लाभत आहे.नृसिंह पुराणकथा श्रवण करण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोखर्णी नृसिंह येथील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम