शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : माजलगावचे पोलीस पाथरीत तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:12 IST

रेशनचे २०० पोते धान्य माजलगाव पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजलगावचे पोलीस पाथरीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिसांनी धान्याचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. पाथरी येथील शासकीय गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान हा गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : रेशनचे २०० पोते धान्य माजलगाव पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजलगावचे पोलीस पाथरीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिसांनी धान्याचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. पाथरी येथील शासकीय गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान हा गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरणाची नवी पद्धत दोन महिन्यांपासून अंमलात आणली जात आहे. शासनाच्या गोदामातून थेट रेशन दुकानदारापर्यंत माल पोहचविण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. तसेच स्वस्तधान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनचा वापर सुरु झाला आहे. धान्य पोहचविणाºया वाहनांवर जीपीएस प्रणाली देखील बसविली आहे. एवढे सर्व असताना स्वस्तधान्य दुकानातील माल काळ्या बाजारात जाण्याचा प्रकार माजलगाव पोलिसांनी उघड केला. दोनशे पोते धान्य असलेला टेंपो १३ फेब्रुवारी रोजी पकडला होता. हा टेंपो पाथरी तालुक्यात धान्य वितरणासाठी वापरला जात होता.माजलगाव पोलिसांनी पकडलेला टेंपो आणि त्यातील माल तपासण्यासाठी पाथरीच्या पुरवठा विभागातील नायब तहसीलदार निलेश पळसकर यांना माजलगाव येथे बोलावून मालाची सत्यता तपासण्यात आली. माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत माजलगावचे पोलीस दोन दिवसांपासून पाथरीत तळ ठोकून आहेत. शासकीय गोदामातील धान्याची तपासणी सुरु आहे. दरम्यान, धान्य गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान कोणतीही रजा न देता गायब झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. या धान्य गोदामाचा अतिरिक्त पदभार बी.के.घनसावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.शासकीय धान्य गोदाम आणि १४ स्वस्तधान्य दुकानदारांना वितरित केलेले धान्य याचा ताळमेळ जुळत असल्याचे सांगितले जात आहे. असे असेल तर पाथरी येथील टेंपोमध्ये पकडलेले धान्य आले कोठून असा सवाल उपस्थित होत आहे.माजलगाव पोलिसांच्या कारवाईनंतर पाथरी येथील पुरवठा विभागाने फेब्रुवारी महिन्यात वितरित केलेल्या १४ स्वस्तधान्य दुकानांची चौकशी केली. त्याचा अहवालही जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला आहे, अशी माहिती तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी दिली.