शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

परभणी : एस.टी. महामंडळाला प्रतिमाह ८ लाखांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:12 IST

छापील तिकीटे बंद करुन डिजीटल तिकीटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजीटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी प्रत्येक महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या उत्पन्नातून महिन्याकाठी ही रक्कम दिली जात असल्याने महामंडळाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

परभणी : एस.टी. महामंडळाला प्रतिमाह ८ लाखांचा भुर्दंडलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छापील तिकीटे बंद करुन डिजीटल तिकीटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजीटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी प्रत्येक महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या उत्पन्नातून महिन्याकाठी ही रक्कम दिली जात असल्याने महामंडळाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन निगम अंतर्गत बससेवा वापरणाºया प्रत्येक प्रवाशाकडून प्रवास भाडे घेतले जाते. यासाठी पूर्वी महामंडळ प्रशासन प्रवासाच्या टप्प्यानुसार कागदी तिकीटांचा वापर करीत असे. ही तिकीटे विभागनिहाय आणि त्यानंतर वाहकनिहाय वितरित केली जात होती आणि विक्री झालेल्या तिकिटांवरुन महामंडळाच्या उत्पन्नाचा लेखाजोखा सांभाळला जात होता.माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रसार होऊ लागला तसा महामंडळाने देखील आपल्या सेवेत बदल करण्याचा निर्णय घेतला. छापील तिकिटांसाठी होणारा खर्च टाळण्याच्या उद्देशाने साधारणत: २०११ मध्ये छापील तिकीटे बंद करण्यात आली आणि ही जागा डिजीटल तिकीटांनी घेतली. ही डिजीटल तिकीटे देण्यासाठीची यंत्रणा महामंडळाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर २०११ मध्ये ट्रायमॅक्स या कंपनीसोबत करार करण्यात आला.प्रति तिकीट ३८ पैसे कंपनीला मशीन भाडे म्हणून देण्याचे निश्चित झाले. हा करार केवळ एक वर्षाच्या प्रायोगिक तत्वावर होता. त्यानंतर महामंडळाने स्वत:ची मशीन खरेदी करुन तिकीटे देणे अपेक्षित होते. मात्र तब्बल ७ वर्षापासून या संदर्भात निर्णय झाला नाही आणि अजूनही किरायाच्या मशीनवरच महामंडळामार्फत डिजीटल तिकिटे प्रवाशांना दिली जात आहेत.परभणी विभाग नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील ४ आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ अशा ७ आगारांचा समावेश आहे.या सातही आगारांमधून दररोज सुमारे ७२ हजार तिकीटे विक्री होतात. करारानुसार प्रति तिकीट ३८ पैसे या प्रमाणे दररोज २७ हजार ३६० रुपये आणि महिन्यासाठी ८ लाख २० हजार ८०० रूपये मशीनच्या कंपनीला भाड्यापोटी दिले जात आहेत. सर्वसाधारणपणे केवळ १० ते १५ हजार रुपये किंमतीची असलेली मशीन महामंडळाने स्वत: खरेदी केली असती तर या सर्व रक्कमेचे नुकसान टळले असते. परंतु, प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षानुवर्षापासून महामंडळाच्या उत्पन्नातून डिजीटल तिकिटे देणाºया कंपनीचा फायदा मात्र केला जात आहे. एकट्या परभणी विभागात ८ लाखांचे नुकसान होत असेल तर राज्यातील नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात जात आहे.या सर्व बाबी लक्षात घेता महामंडळाने योग्य निर्णय घ्यावा व महामंडळाच्या उत्पन्नात भर घालून हीच रक्कम प्रवाशांच्या सुविधेसाठी किंवा महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या हितासाठी वापरली तर खºया अर्थाने एस.टी. महामंडळ ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ होईल, अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचारी खाजगीत बोलून दाखवित आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीticketतिकिट