शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विषाणूजन्य तापाचा वाढला फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:43 IST

शहरात विषाणूजन्य तापाचा फैलाव वाढला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: बालके आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या संसर्गजन्य तापाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात विषाणूजन्य तापाचा फैलाव वाढला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: बालके आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या संसर्गजन्य तापाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.एक महिन्यापासून जिल्ह्यातील वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. बालके आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते. परिणामी तापीची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये बालके आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. थंडी वाजणे, ताप येणे, सर्दी आणि खोकल्याने त्रस्त झालेले अनेक रुग्ण खाजगी आणि जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. विषाणूजन्य तापाबरोबरच डेंग्यूच्या तापाचाही फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश्य तापीने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्याही जिल्ह्यात अधिक आहे. तापीचा संसर्ग हा मुख्यत्वे डासांच्या माध्यमातून होतो. तर डेंग्यू तापाचा संसर्ग हा एडीस या डासापासून होतो. साचलेल्या पाण्यात तसेच स्वच्छ पाण्यात एडीस या डासाचे वास्तव्य असते. त्यामुळे नागरिकांनी जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.दरम्यान डेंग्यू तापाची साथ शहरात पसरल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. प्रत्येक कुटूंबात तापीची लागण झालेला रुग्ण आढळत आहे. तसेच अंग दुखणे, अंग जड पडणे अशी लक्षणेही आढळत आहेत. शहरात वाढत्या तापीच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल