शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

परभणी : रस्त्यांच्या कामांना गती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:29 IST

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया देऊळगाव-डासाळा, रवळगाव-आहेर बोरगाव आदी रस्त्यांसाठी गतवर्षी निधी मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करून ६ महिन्याहून अधिक कालावधीत लोटला. मात्र संबंधित कंत्राटदार ही कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीमान करत नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था कोलमडणार असल्याचे चित्र दिसून येते आहे.देऊळगाव ते डासाळा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावरील देऊळगाव, डासाळा, लाडनांद्रा या गावांची वाहतूक धोकादायक बनली होती. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. देऊळगाव ते डासाळा या ३ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. निविदा प्रक्रियेत अनेक दिवस लोटले. त्यानंतर गतीने काम होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काही अंतराचे काम करून अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे पाऊस पडताच या रस्त्यावर वाहतूक करणे अवघड होणार आहे.त्याचबरोबर सेलू-रवळगाव-आहेर बोरगाव- शिंदे टाकळी या दरम्यान खराब झालेला १० कि.मी. रस्ता बनविण्यासाठी जवळपास ३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र ६ महिने लोटले तरी केवळ ६ कि.मी. रस्त्याचेच काम पूर्ण झाले आहे. सीलकोट, साईडपट्याचे काम अद्यापही केले नाही. तालुक्यातील रस्त्यांची कामे करण्यासाठी राजकीय पुढारी मर्जीतील गुत्तेदारांवर मेहरबानी दाखवतात. परिणामी रस्ता कामाला गती मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.सेलू तालुक्यातील देऊळगाव ते डासाळा, सेलू-रवळगाव - आहेर बोरगाव - शिंदे टाकळी या रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. सेलू ते मानवत रोड या रस्त्यावरील कार्पेट केले. मात्र सीलकोट करण्यासाठी डांबर सहज उपलब्ध होत नाही. लवकरच रखडलेली कामे पूर्ण करू.-बळीराम माने,शाखा अभियंता ,सा.बां.विभाग सेलू

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूक