शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रस्ते दुरुस्तीसाठी सोनपेठकर पुन्हा उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:47 IST

तालुक्यातील खराब रस्त्यांचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसल्यानंतर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी २५ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : तालुक्यातील खराब रस्त्यांचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसल्यानंतर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी २५ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले़परभणी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोनपेठ तालुक्याला आरोग्य, शिक्षण व दळणवळणाच्या मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत़ त्यातच रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट झालेली आहे़ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गतवर्षी सोनपेठकरांनी जवळपास महिनाभर आंदोलन केले होते. त्यानंतर रस्ते दुरुस्तीसाठी सोनपेठकरांना आश्वासन मिळाले़ आज ना उद्या हे रस्ते दुरुस्त होतील, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सोनपेठ तालुकावासियांचा भ्रमनिरास झाला आहे़ त्यातच २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याचा दौरा आटोपून नांदेडकडे निघाले होते़ वाटेतच सोनपेठ शहराजवळ त्यांची गाडी पंक्चर झाली़ त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील खराब रस्त्यांचा फटका मुख्यमंत्र्यांनाही बसला़ या घटनेनंतर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने सोनपेठ तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सोमवारी पोलीस ठाण्यासमोरील परळी-पाथरी या राज्य रस्त्यावरील खड्ड्यात बसून नागरिकांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले़ त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या़ त्यानंतर नायब तहसीलदार सय्यद सलीम, मंडळ अधिकारी शिवाजी कराड, ेदेवेंद्रसिंह चंदेल, पोलीस ठाण्याचे अनिल शिंदे, सुधाकर मुंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन नागरिकांचे निवेदन स्वीकारले़ या निवेदनात मुख्यमंत्र्यांच्या टायरफुटीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करून ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे़ आंदोलनात सुधीर बिंदू, कृष्णा पिंगळे, रवींद्र देशमुख, राधेश्याम वर्मा, राजेश खेडकर, मंजूर मुल्ला, शिवमल्हार वाघे, भागवत पोपडे, अ‍ॅड़ दिलीप मोकाशे, बाळकृष्ण बहादूर, सुभाष वांगकर, विश्वंभर गोरवे, सोमनाथ नागुरे, अंगद काळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फिरविली पाठसोनपेठ तालुक्यातील सर्वच नागरिक रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झाले आहेत़ त्यातच २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाल्याने संतप्त झालेल्या सोनपेठकरांनी २५ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर बसून आंदोलन केले़ या आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तालुका प्रशासन आंदोलनस्थळी हजर झाले़ मात्र मूग गिळून गप्प बसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र आंदोलनस्थळी येणे उचित समजले नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस