शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पित्याचा खून करणाऱ्या आरोपी पुत्रास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:07 IST

येथील बसस्थानकासमोरच चाकूचे सपासप वार करून जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्तही वाढविला होता. घरगुती वादातून हा प्रकार घडला असून, पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीस अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : येथील बसस्थानकासमोरच चाकूचे सपासप वार करून जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्तही वाढविला होता. घरगुती वादातून हा प्रकार घडला असून, पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीस अटक केली आहे़परभणी तालुक्यातील साडेगाव येथील नारायण सटवाजी नवघरे हे कुटुंबियांसह जिंतूर शहरात वास्तव्यास आहेत. १३ मे रोजी ते बसस्थानकासमोरील रस्त्यावरुन जात असताना त्यांना मुलगा राजू नवघरे हा त्या ठिकाणी आला व त्याने आपल्या पित्यावरच चाकूचे वार केले. त्यामुळे नारायण नवघरे (४५) हे जमिनीवर कोसळले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर राजू पसार झाला. नागरिकांनी धावपळ करीत जखमी अवस्थेतील नारायण नवघरे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरा मयताचा भाऊ भागोजी सटवाजी यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी राजू नवघरे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला़ त्यानंतर रविवारी रात्रीच आरोपी राजू नवघरे याला पोलिसांनी साडेगाव येथून अटक केली.

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनPolice Stationपोलीस ठाणेArrestअटक