शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तीव्र उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:44 IST

जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून महिनाभरापासून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. रविवारी जिल्ह्यात कडक उन्हामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून महिनाभरापासून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. रविवारी जिल्ह्यात कडक उन्हामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला.यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून नागरिक दुष्काळाचा सामना करीत आहे. मार्चपासूनच ऊन तापू लागले आहे. जवळपास एक महिनाभर उन्हाचा पारा ४० अंशांपेक्षा अधिक नोंद झाल्याने नागरिकांना उन्हाचा फटका सहन करावा लागला.मध्यंतरी वातावरणात बदल होऊन अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली होती; परंतु, १९ एप्रिलपासून पुन्हा तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, पंखे, कूलर्स आणि एसीचा वापर वाढला आहे. दिवसा शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे दिवसभर प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेतही शुकशुकाट पहावयास मिळत असून सायंकाळनंतर मात्र हळूहळू सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना उपाय करावे लागणार आहेत.उन्हाच्या पाºयाने गाठली चाळिशी४जिल्ह्यात यावर्षी तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. साधारणत: एक महिन्यापासून जिल्ह्याचे तापमान चाळीस अंशापेक्षा पुढे सरकल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. १३ व १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात ४२.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. १५ रोजी ४०.७ अंश तापमान नोंद झाले.४१६, १७ व १८ एप्रिल असे तीन दिवस जिल्ह्यामध्ये वादळी वाºयासह पाऊस झाल्याने तापमानात घट झाली होती. ३७ ते ३८ अंशापर्यंत या काळात तापमान नोंद झाले. त्यानंतर मात्र पुन्हा तापमान वाढत चालले असून २० एप्रिल रोजी ४१.२ अंश तर २१ एप्रिल रोजी ४०.६ अंश तापमानाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान