शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: २०० क्विंटल हळदीची पहिल्याच दिवशी खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:07 IST

जिंतूर तालुक्यातील बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारपासून हळदीची खरेदी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी कृउबा मार्केट यार्डात २०० क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली आहे. या हळदीला ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारपासून हळदीची खरेदी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी कृउबा मार्केट यार्डात २०० क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली आहे. या हळदीला ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ६ एप्रिल रोजी बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी एम.यु.यादव यांच्या हस्ते हळद खरेदी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एस.एम.कासटवार, संतोष चौधरी, यमाजी इप्पर, डी.एल.गायकवाड यांची उपस्थिती होती. मार्केट यार्डात हळद विक्रीस आणलेल्या करवली येथील रावसाहेब घाटुळ, बोर्डी येथील कुंडलिकराव कदम, बोरी येथील शेख अतिक शेख रफीक या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ६ एप्रिलपासून बोरी बाजार समितीत हळद खरेदी करण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील २० ते २५ गावातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी झालेल्या हळद खरेदी- विक्रीमध्ये व्यापारी त्र्यंबकराव बोर्डीकर, दीपक अग्रवाल, राजगोपाल झंवर, आनंद मुरक्या, मुरली झंवर, सुनील झंवर, राजू जैन, प्रसाद गोरे, भगवान झंवर, नंदकुमार पतंगे, पंकज चौधरी, प्रकाश झंवर, लिंबाजी टाक, अनंत देशमुख, प्रकाश देशमुख, हनुमान अग्रवाल, अरुण कदम, प्रवीण बिर्ला, रवि झंवर, एकनाथ गोरे या व्यापाºयांसह शेतकरी दगडोबा वजीर, बाजीराव शेवाळे, वामन शिंपले, रामकृष्ण शिंपले, भागोजी शिंपले यांनी सहभाग घेतला होता.यशस्वीतेसाठी बी.एन.रोडे, आर.एम.टाक, आर.एम.चक्कर, गोविंद राऊत आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजार