शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दसरा मुहुर्तावर शिर्डी गुलाब महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:23 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा सणानिमित्त शिर्डी गुलाब, दांडी गुलाब (छोटा गुलाब) आणि झेंडूची आवक दसरा सणाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून सध्यातरी पक्ष पंधरवडा असल्याने फुलांनाही म्हणावा तसा भाव मिळत नाही.

यशवंत परांडकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा सणानिमित्त शिर्डी गुलाब, दांडी गुलाब (छोटा गुलाब) आणि झेंडूची आवक दसरा सणाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून सध्यातरी पक्ष पंधरवडा असल्याने फुलांनाही म्हणावा तसा भाव मिळत नाही.परभणी शहरात व जिल्ह्यामध्ये हैदराबाद, पुणे, नांदेड या मोठ्या शहरांतून छोटा गुलाब, झेंडू, शेवंती, जरबेरा, मोठा गुलाब, काकडी इ. विविध प्रकारची फुले विक्रीस येत आहेत.गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त नसल्यामुळे फुलांची आवकही घटली होती. शिर्डी गुलाब २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे विक्री होतो. दसरा हा मोठा सण तोंडावर असून झेंडूच्या फुलांनाही मागणी वाढली आहे. झेंडूची फुले २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे सध्या विकली जात आहेत. दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले भाव खावून जातील, असेही विक्रेता करीम फुलारी म्हणाले. शेवंतीच्या फुलाला म्हणावी तेवढी मागणी नसली तरीही शेवंतीची फुले ३५ रुपये किलो प्रमाणे विकली जात आहेत. निशिगंधा फुलांनीही चांगला भाव खाल्ला आहे. सणासुदीच्या तोंडावर निशिगंधा फुलांचा भाव ८० ते १०० किलोप्रमाणे असून घासाघीस केल्यास विक्रेते फुलांचा भाव कमी आहेत. दरम्यान, दसरा सण अवघ्या १६ दिवसांवर येऊन ठेपला असून ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विकला जाणारा शिर्डी गुलाब हा दसºयाच्या मुहूर्तावर ५० त ५५ किलो भावाने विकला जाऊ शकतो. दसºयाच्या दिवशी शिर्डी गुलाबाच्या भावाची स्थिती काय असेल हे त्याच दिवशी कळेल, असे फूल विक्रेते करीम फुलारी यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीDasaraदसराDiwaliदिवाळी