शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: वाहतूक सुरू होण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:19 IST

कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे़. या महामार्गाचे काम पुर्ण होऊन त्यावर वाहने धावण्यापूर्वीच या रस्त्याला परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या दरम्यान भेगा पडल्याचे वास्तव समोर आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे़. या महामार्गाचे काम पुर्ण होऊन त्यावर वाहने धावण्यापूर्वीच या रस्त्याला परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या दरम्यान भेगा पडल्याचे वास्तव समोर आले आहे़परभणी जिल्ह्यातील महामार्गासह ग्रामीण रस्त्यांची बकाल अवस्था झालेली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातून जाणाऱ्या महामार्गांचे काम तातडीने हाती घेवून नागरिकांना दर्जेदार व गुळगुळीत रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली़ त्यानंतर राज्य व केंद्र शासनाने जिल्ह्यातील नागरिकांची रस्त्याबद्दलची मागणी लक्षात घेता परभणी-गंगाखेड, जिंतूर-परभणी, परभणी- पाथरी व परभणी- वसमत या चारही महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुरू केली़ त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर केला़ या चार महामार्गापैकी परभणी- पाथरी या महामार्गाचे काम अंतीम टप्प्यात आहे तर उर्वरित तीन महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे़केंद्र व राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याने नागरिकांच्या मागणीप्रमाणे दर्जेदार रस्ते उपलब्ध होतील, अशी अपेक्षा जिल्हावासियांना आहे; परंतु, परभणी-गंगाखेड या महामार्गाची पाहणी केली असता, परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या परिसरामध्ये तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याला वाहने धावण्यापूर्वीच भेगा पडल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे या रस्त्यासाठी मंजूर असलेल्या २०३ कोटी रुपयांच्या निवीतून होत असलेल्या कामांवर कंत्राटदार व अभियंत्यांचे लक्ष नाही की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़ या कामांकडे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय? असा सवाल वाहनधारक व नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़वाहने धावण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला जर भेगा पडत असतील तर हा रस्ता राज्य व केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीपर्यंत टिकेल की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होत असलेल्या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे गुणवत्तेकडे दुर्लक्ष ?४परभणी- गंगाखेड हा राष्ट्रीय महमार्ग आहे़ त्यामुळे या रस्त्यावरून २४ तास दुचाकीसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते़ त्यामुळे या रस्त्याचे काम करताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे़; परंतु, या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना दैठणा ते धारासूर परिसरात सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत़ त्यामुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत वाहनधाकांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे़काळ्या मातीचा वापर का?४परभणी-गंगाखेड या महामार्गाचे खोदकाम झाल्यानंतर पक्का मुरूम टाकून दबाई करणे आवश्यक होते; परंतु, या महामार्गाची दबाई करताना काळ्या मातीचा वापर होत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या होत्या़४मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले़ त्यामुळे परभणी-गंगाखेड या महामार्गावरून वाहने धावण्यापूर्वीच व रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तडे जात आहेत़४त्यामुळे रस्त्याची दबई करताना पक्क्या मुरूमाऐवजी सर्रास काळ्या मातीचा वापर झाला की काय ? हा रस्ता तयार करताना सिमेंट, गिट्टी व गज या तिन्हींचा आवश्यक तेवढा वापर झाला की नाही? याबाबत नागरिक व वाहनधारकांतून सवाल उपस्थित केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकState Governmentराज्य सरकार