शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

परभणी : शाळांना मिळणार गॅस जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:46 IST

शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, या संदर्भातील माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, या संदर्भातील माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे़जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देत असताना गॅस जोडण्या नसल्याची बाब समोर आली होती़ पारंपारिक पद्धतीने सरपनाचा वापर करून पोषण आहार शिजवून दिला जात होता़ यामुळे एकीकडे प्रदूषणात वाढ होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही धुरामुळे परिणाम होत होता़ या अनुषंगाने या शाळांना शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी गॅस जोडणी देण्याची मागणी करण्यात येत होती़ त्यानुसार शालेय पोषण आहार योजनेच्या २०२०-२१ च्या वार्षिक कार्यक्रम व अंदाजपत्रक मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या मान्यता मंडळाची बैठक होणार आहे़त्या बैठकीत याबातचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे़ त्या अनुषंगाने राज्यातील ज्या शाळांमध्ये आहार शिजविण्यासाठी गॅस कनेक्शन नाही, अशा शाळांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ या संदर्भातील आदेश वित्त व लेखा विभागाच्या उपसंचालक पद्मश्री तळदेकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीzp schoolजिल्हा परिषद शाळा