शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीला १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:19 IST

१०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास आरोग्य विभागाने मंजुरी देऊन २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे़ त्यामुळे स्त्री रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथे १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास आरोग्य विभागाने मंजुरी देऊन २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे़ त्यामुळे स्त्री रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे़येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ साठ खाटांचे स्त्री रुग्णालय जुन्या इमारतीत कार्यान्वित आहे़ परंतु, जिल्ह्यातून येणाºया महिला रुग्णांची संख्या ही १५० च्या वर आहे़ त्यामुळे महिलांना उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता़ त्यामुळे परभणी येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय हवे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परभणीकरांची होती़ तसा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयाने शासनाकडे पाठविला होता़ आरोग्य विभागाच्या वरिष्ठस्तरावर दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या़ आ़ डॉ़ पाटील यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केल्यामुळे परभणी येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर करून त्यास राष्टीय आरोग्य अभियानांतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ त्यास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे़ त्यामुळे स्त्री रुग्णालयास १०० खाटांची सुसज्ज इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़