शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : संक्रांतीसाठी सजला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:01 IST

मंगळवारी संक्रांतीचा सण साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार भागात बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर या बाजारपेठेत महिला ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मंगळवारी संक्रांतीचा सण साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार भागात बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर या बाजारपेठेत महिला ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवत आहे. मागील दोन महिन्यांपासून परभणी शहरातील बाजारपेठेतील उलाढाल जवळपास ठप्प झाली होती. ग्राहकांची संख्या रोडावल्याने व्यापारी आर्थिक कचाट्यात अडकले आहेत. संक्रातीच्या सणावरही दुष्काळाचे सावट पहावयास मिळाले. दरवर्षी या बाजारपेठेत संक्रातीच्या खरेदीसाठी असणाऱ्या गर्दीच्या तुलनेत यावर्षीची गर्दी कमी होती.संक्रात हा महिलांचा सण असून यानिमित्ताने विविध वस्तुंची, खाद्यपदार्थांची खरेदी होते. येथील गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर परिसर येथे लघु व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठेत प्रथमच ग्राहकांची गर्दी पहावयास मिळाली. हळद- कुंकू, रांगोळी, पुजेचे साहित्य, वाण, सुगडे, बिब्याची फुले, वाळूक आदी साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली असून सकाळपासूनच खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या बाजारपेठेत गर्दी कायम होती. जिल्ह्यातील लघुबाजारपेठेत मागील अनेक महिन्यानंतर रविवारी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली.वाणाच्या साहित्याला मागणी४संक्रांती सणाच्या काळात वाण देण्याची प्रथा रुढ आहे. यासाठी विविध वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. ग्रामीण भागातून व्यावसायिक परभणीत दाखल झाले आहेत. प्लास्टिक, स्टीलच्या वस्तूंबरोबरच पॉकेट बंद खाद्यपदार्थ वाणासाठी उपलब्ध झाले आहे. पारंपरिक पूजेच्या साहित्याबरोबरच वाणाचीही खरेदी दिवसभरात वाढली होती.तिळाचे भाव गगनालातीळगूळ घ्या, गोडगोड बोला, असे म्हणत तीळगूळ देऊन संक्रांत साजरी केली जाते. यावर्षी तिळाची आवक बाजारपेठेत वाढली आहे; परंतु, भावही त्याच प्रमाणात वाढल्याने संक्रांतीच्या सणावर महागाईचे ढग दिसत आहेत. एरव्ही ८० ते १०० रुपये किलो या दराने मिळणारे तीळ रविवारी मात्र १४० ते १५० रुपये किलो या दराने विक्री झाले. सणानिमित्त मोठ्या प्रमाणात तिळाची खरेदी झाली असली तरी जास्तीचे पैसे मोजून सण साजरा करावा लागत आहे. दुसरीकडे गुळाचे भाव मात्र स्थिर आहेत. रविवारी ४० रुपये किलो दराने गुळाची विक्री झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुºहाळ सुरु झाले असून त्याचा परिणाम गुळाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMakar Sankrantiमकर संक्रांती