शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:04 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी मुंंंबई येथून वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. दोंडे यांची नियुक्ती झाली. सुुरुवातीला दोन-चार दिवस राहिल्यानंतर महिन्यातील चार दिवस जिंतूरला राहून उर्वरित दिवसाचा कारभार मुंबई येथून बघायचा, हे नित्याचेच झाले आहे. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात नसल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण या रुग्णालयात येतात; परंतु, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना खाजगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागतो.विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. त्याच बरोबर औषधींचा तुटवडा जानवत असून बॅडेंंज पट्टीपासून ते दररोज रुग्णांना लागणारी कोणतीच औषधी रुग्णालयात नाहीत. अनेक डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास भाग पाडतात. दररोज येणाऱ्या रुग्णांची तपासणी व्हिजीट डॉक्टरांकडून करून घेण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टर ओपीडी काढत नसल्याने नियमित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आदी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये रुग्णाला पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही. रुग्णांचे हाल प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. रुग्णांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. तीनच स्वच्छता कर्मचारी असल्याने रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, शौचालयातील स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या शिवाय रुग्णालयातील अनेक विभागात डॉक्टरांची गरज असते. तात्पुरत्या सेवा देणारे डॉक्टर खाजगी सेवा देण्यास जास्त महत्त्व देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रुग्णालयातील मोडकळीस आलेला कारभार सुधारावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकातून होत आहे.रुग्णालय रामभरोसे४जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मुंबईत असल्याने रुग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार व इतर रुग्ण सेवक यांच्यावर नियंत्रण राहिले नाही. कोणताही कर्मचारी केव्हाही निघून जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयास प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके व आपण स्वत: भेट देऊन रुग्णालयातील कारभारात तातडीने सुधारणा करण्याबाबत सूचना ्रकेल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात रविकांत चांडगे यांना कारभार पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.-रिझवान काझी,निवासी शल्य चिकित्सक, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल