शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नटराज रंगमंदिरातील कक्षाचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:06 IST

येथील नटराज रंगमंदिरमधील प्रभाग समिती सभापतींच्या कक्षाचे पीओपीचे छत कोसळल्याची घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़ शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील नटराज रंगमंदिरमधील प्रभाग समिती सभापतींच्या कक्षाचे पीओपीचे छत कोसळल्याची घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़ शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली आहे़येथील जुना मोंढा भागातील नटराज रंगमंदिराची इमारत जीर्ण झाल्याने हे नाट्यगृह पाच वर्षांपासून बंद आहे़ या ठिकाणी कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने महानगरपालिकेने या नाट्यगृहात प्रभाग समिती अ चे कार्यालय स्थापन केले आहे़या ठिकाणी या प्रभागांतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातात़ तसेच नळपट्टी, घरपट्टी व इतर कामेही या कार्यालयातून चालतात़ प्रभाग समिती अ च्या सभापती अमरिका बेगम अ़ समद यांच्यासाठी याच ठिकाणी कक्ष देण्यात आला आहे़ सोमवारी शहरात सकाळपासून पाऊस होत होता़या पावसाच्या पाण्यामुळे सभापतींच्या कक्षाचे प्लास्टर आॅफ पॅरिस कोसळले़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़दरम्यान, पावसामुळे नटराज रंग मंदिरातील प्रभाग समितीच्या कार्यालयात जागोजागी पाणी साचले आहे़ महत्त्वाचे दस्ताऐवजही पाण्याने भिजले आहेत़ अशा धोकादायक अवस्थेत कर्मचाºयांना या ठिकाणी काम करावे लागत आहे़दुरुस्तीची केली होती मागणीदरम्यान, प्रभाग समिती सभापती अमरिका बेगम यांनी १७ जुलै रोजी मनपा आयुक्तांना पत्र पत्र पाठवून नाट्यमंदिरातील कार्यालयाच्या अवस्थेविषयी माहिती दिली होती़ नाट्यगृह अनेक ठिकाणी गळत आहे़ त्यामुळे कार्यालयात पाणी साचते़ कर्मचाºयांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी येत आहेत़ तसेच नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ तेव्हा या कार्यालयाची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती; परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले़ विशेष म्हणजे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनीही १९ जुलै रोजी आयुक्तांना पत्र पाठवून इमारतीच्या छताची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे कळविले होते़ छताच्या किरकोळ दुरुस्तीची कामे तातडीने करून घेणे योग्य राहील, असेही कळविले होते़ नाट्यगृहाच्या छताची वेळीच दुरुस्ती झाली असती तर ही घटना टळली असती़

टॅग्स :parabhaniपरभणी