शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हा कसला रस्ता सुरक्षा सप्ताह ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:32 IST

शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताहात या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताहात या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियान साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत ठिकठिकाणी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यात सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत. याबाबी आवश्यक असल्या तरी प्रशासकीयस्तरावर मात्र सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस पाऊले उचलली जात नाहीत. शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होतो. परंतु, पोलीस प्रशासन मात्र या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढत नसल्याने त्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहेत.परभणी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १० वर्षांपूर्वी मुख्य चौकांमध्ये सिग्नल्स बसविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बसस्थानक, जांब नाका, नारायण चाळ या ठिकाणी बसविलेले सिग्नल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. हे सिग्नल सुरु करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन दोन्ही विभाग पुढाकार घेत नाहीत. परिणामी वर्षानुवर्षापासून लाखो रुपयांची ही यंत्रणा शहरात धूळखात उभी आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.शनिवारी शहरातील वाहतुकीसंदर्भात पाहणी केली असता हीच परिस्थिती दिसून आली. शहरातील वाहनधारक नियमांचे पालन करीत नाहीत आणि नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे जागोजागी वाहतुकीचे नियम मोडत वाहने भरधाव वेगाने चालविली जातात. परिणामी शहरातील वाहतूक असुरिक्षत झाल्याचे दिसत आहे. शनिवारी केलेल्या पाहणीत नानलपेठ परिसरातून शिवाजी चौकात येण्यासाठी प्रवेशबंदी असतानाहीे अनेक वाहनधारकांनी सर्रास व बिनधोकपणे विरुद्ध मार्गाने वाहने चालविल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे बाजारपेठ भागामध्ये सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. असे असताना बाजारपेठेच्या रस्त्यावर अनेक जड वाहने धावताना दिसून आली.पोलीस प्रशासनाने याविरुद्ध कारवाई केली तरी वाहतुकीची समस्या निकाली निघू शकते. मात्र शहरात रस्ता सुरक्षा सप्ताहातही वाहतूक नियम डावलणाºया वाहनधारकांवर कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळाले.दरम्यान, शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठस्तरावरुन पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.पार्किंगच्या समस्येवर निघेना तोडगाशहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण अधिक आहे. अलीकडच्या काही दिवसांत नारायणचाळ भागात ही समस्या वाढत चालली आहे. या ठिकाणी दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहने अडकून पडतात तर शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने नानलपेठ, कच्छी बाजार, गुजरी बाजार या भागात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बाजारपेठ भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. दुकानांसमोर रस्त्यावर लावलेली वाहने, हातगाडे यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पाच वर्षांपुर्वी शहरात सम आणि विषम तारखांना पी-१, पी २ पार्किंगचे नियोजन केले होते. बाजारपेठेमध्ये आजही हे फलक दिसून येतात. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या समन्वयातून पार्किंगच्या जागा निश्चित केल्या तर वाहतुकीची समस्या निकाली निघू शकते.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी