शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रस्त्याच्या दुरवस्थेने वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:01 IST

शहरातून जाणाऱ्या परळी-सोनपेठ या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्यावरील पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुरवस्थेने बुधवारी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा समोरील भाग उंचावल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): शहरातून जाणाऱ्या परळी-सोनपेठ या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्यावरील पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुरवस्थेने बुधवारी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा समोरील भाग उंचावल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.परभणी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर सोनपेठ तालुका वसलेला आहे. तालुक्याची निर्मिती झाल्यापासून ते आतापर्यंत मुलभूत सुविधांचा अभाव आहे. तालुक्यासाठी केवळ सोनपेठ शहरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेले नाही. त्याच बरोबर तालुक्यातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, पक्के रस्ते तयार करावेत, यासाठी सोनपेठ तालुकावासियांनी जवळपास महिनाभर आंदोलने केली. मात्र लेखी आश्वासनाशिवाय तालुकावासियांच्या हाती काहीच लागले नाही. आज ना उद्या तालुक्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण होईल, या आशेवर तालुकावासिय असतानाच शहरातून जाणाºया परळी-सोनपेठ या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. शहरातील पोलीस ठाण्यासमोर या मार्गाची अक्षरश: चाळणी झालेली आहे. हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी नागरिकांनी अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे नागरिकांच्या पाठपुराव्याला केराची टोपली दाखविली. सध्या तालुक्यात ऊस तोडणी सुरू आहे. ३० जानेवारी रोजी सकाळी वाघाळा येथून सोनपेठकडे येणारा उसाचा ट्रॅक्टर सोनपेठ शहरातील पोलीस ठाण्याजवळील खड्डेयुक्त रस्त्यावर चालकाच्या सतर्कतेमुळे पलटी होण्यापासून वाचला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.वाघाळा ते सोनपेठ या १२ कि.मी. अंतरासाठी ४ तास लागत आहेत. त्याच बरोबर खराब रस्त्यांमुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉली उलटत आहेत. खड्ड्यांमुळे ट्रॉलीमधील उसाच्या मोळ्या रस्त्यावर पडत आहेत. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे.-तुकाराम तिडके, ट्रॅक्टर चालकसोनपेठ शहरातील पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर सतत पाणी येत असल्यामुळे हा रस्ता नेहमीच खराब होत आहे.-ए. विघ्ने, उपअभियंता, सोनपेठ

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा