शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आढावा बैठक : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:33 IST

जिल्ह्यात ७७ कोटी रुपयांच्या रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील कामे तत्काळ सुरु करावेत, अशा सूचना स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात ७७ कोटी रुपयांच्या रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील कामे तत्काळ सुरु करावेत, अशा सूचना स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २० एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहात ८ एप्रिल रोजी विविध विकासकामांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची उपस्थिती होती.या आढावा बैठकीमध्ये लोणीकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या मागणीप्रमाणे शासनाने पाणीपुरवठ्याच्या २३ योजनांना मंजुरी दिली आहे. त्या सर्वच योजनांची तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करुन वेळेत कामे पूर्ण करावीत. या संदर्भातील सर्व अधिकार शासनाने जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिले आहेत. त्या सोबतच पाथरी तालुक्यातील गुंज येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ५१ लाख रुपये देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.या बैठकीत महानगरपालिकेच्या विविध कामांचा आढावा घेऊन अटल अमृत योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची माहिती जाणून घेतली. तसेच महावितरण मधील कामांचा आढावा घेऊन दीनदयाल उपाध्याय योजनेची स्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील ५४ कोटी रुपयांच्या पोल व केबल बदलण्याच्या नियोजित कामाचा आढावा घेतला.या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान, समाधान शिबीर इ. बाबत अधिकाºयांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विकास कामांचे ई-भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीस माजी आ.विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, आनंद भरोसे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीprime ministerपंतप्रधानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर