शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अवैध वाळू चोरी प्रकरणी महसूल कर्मचारी गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:27 IST

तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १ हजार ५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात चार गावांतील पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. पाथरी तालुक्यामध्ये गतवर्षी जुलै महिन्यात २२ ठिकाणचे वाळू साठे महसूल प्रशासनाने जप्त केले होते. यामध्ये तब्बल ४ हजार ५०० ब्रास वाळू साठा आढळून आला होता. वाळू साठे जप्त करून त्या त्या गावच्या पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १ हजार ५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात चार गावांतील पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.पाथरी तालुक्यामध्ये गतवर्षी जुलै महिन्यात २२ ठिकाणचे वाळू साठे महसूल प्रशासनाने जप्त केले होते. यामध्ये तब्बल ४ हजार ५०० ब्रास वाळू साठा आढळून आला होता. वाळू साठे जप्त करून त्या त्या गावच्या पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले होते.जप्तीची कारवाई झाल्यानंतर वाळू साठ्याचे लिलाव होण्यापूर्वीच जप्त साठ्यातील वाळूला पाय फुटल्याचे दिसून आले. या साठ्यातील वाळू चोरी होत असल्याचा प्रकार निदर्शनास येताच महसूल विभागाने जानेवारी २०१८ मध्ये वाळू साठ्याची तपासणी केली. याचा अहवाल पाथरी येथील उपजिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आला. त्यानंतर २२ साठ्यांपैकी ९ वाळू साठा चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. तालुक्यातील लोणी सज्जाचे तलाठी एस.एन.शिंदे, हादगावचे मंडळ अधिकारी गोवंदे, लोणीचे पोलीस पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याच बरोबर हादगाव बु., वरखेडा, डाकू पिंपरी आणि तारूगव्हाण येथील पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी यांनाही नोटिसा देण्यात आल्या.या साठ्यातून शासनाचा २८ लाखांचा महसूल बुडाला आहे. तसेच वाळू साठे करणाºया शेतमालकांवरही गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या सातबारावरही बोजा पडणार आहे.उपजिल्हाधिकाºयांनी बजावली फेरनोटीसवाळू साठे जप्त झाल्यानंतर वेळेच्या आत या वाळू साठ्याचा लिलाव होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. रात्री-बेरात्री वाळू तस्करांंनी वाळुची चोरी केली. वाळू साठे चोरी गेल्याचे सुरुवातीला फारसे गांभीर्य वाटले नाही. मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंंतर यंत्रणा कामाला लागली. वाळू चोरी प्रकरणात यापुर्वी ८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच महसूल कर्मचाºयांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.या संदर्भात पोलीस पाटील, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर काय कारवाई केली? याची फेरनोटीस उपजिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना दिले आहेत.बंधाºयासाठी वाळू वापरलीतारूगव्हाण येथील बंधारा कार्यक्षेत्रामध्ये २ हजार ५०० ब्रास जप्त वाळू साठा शिल्लक होता. यातील १६ लाख रुपये किंमतीची ९०० ब्रास वाळू बंधाºयाचे ठेकेदार पियूष कंस्ट्रक्शनचे मालक अरविंद रेड्डी यांनी प्रशासनाच्या परस्पर बंधारा कामासाठी वापरली. त्यानंतर ९०० ब्रास वाळू चोरी प्रकरणी ठेकेदार अरविंद रेड्डी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.पाथरी तालुक्यातील जप्त वाळू साठे चोरी प्रकरणी जबाबदार कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत दोन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.-सी.एस.कोकणी, उपजिल्हाधिकारी, पाथरी