शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘तुफानातील दिवे’ संगीतमय कार्यक्रमास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:17 IST

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या ‘तुफानातील दिवे’ या संगीतमय कार्यक्रमास मानवतकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या ‘तुफानातील दिवे’ या संगीतमय कार्यक्रमास मानवतकरांनी मोठा प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष सत्यशील धबडगे हे होते. व्यासपीठावर गणेश कुमावत, ज्ञानेश्वर मोरे, दत्ता चौधरी, सय्यद जमील, राजू खरात, अनंत भदर्गे, सचिन कोकर, अमृतराव भदर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजीव देखाव्यासह गीत सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन विजय वाकोडे यांच्या हस्ते झाले. शहरातील प्रमुख रस्त्याने मार्गक्रम झालेल्या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळा जागेजवळ समारोप करण्यात आला. सायंकाळी ‘महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देश उभारणीत योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले. १२ रोजी ‘भीम विचारांचा प्रवाह’ या संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन शिवनारायण सारडा यांच्या हस्ते झाले. यावेळी विजयकुमार दलाल, बाबूराव हलनोर, बालाजी दहे, शंकर हरबडे, अमृत भदर्गे, अनंत भदर्गे, विनोद राहटे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते सादर केली. अमोल मगर यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी समिती पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.ल्लसंत सावता मित्र मंडळ वालूरयेथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव चौरे हे होते. यावेळी संत सावता मित्र मंडळाच्या वतीने ११ एप्रिल रोजी गावातील संत सावता नगरात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता फुलांनी सजविलेल्या रथामधून क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ल्लक्रांतीसूर्य प्रतिष्ठान, धनेगावसेलू तालुक्यातील धनेगाव येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. अशोक उफाडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवि केशव खटींग, दिगंबर रोकडे, शरद ठाकर, पवन कटारे यांची उपस्थिती होती. यावेळी खटीेंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाम कटारे यांनी प्रास्ताविक केले. संतोष कटारे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कटारे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.जिंतूर शहरातून मिरवणूक४जिंतूर- क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त समता परिषद व माळी समाजाच्या वतीने जिंतूर शहरातून ११ एप्रिल रोजी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन प्रमोद भांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्यनारायण शर्मा, कपील फारोखी, बाळासाहेब भांबळे, विश्वनाथ राठोड, नानासाहेब राऊत, रामराव उबाळे, रामेश्वर जावळे, मनोहर डोईफोडे, शाहेदबेग मिर्झा, दलमीर खान पठाण, मीनाताई राऊत, अर्चनाताई काळे, अहेमद बागवान, बाळासाहेब काजळे, इर्शाद पिंपरीकर, राजेभाऊ नगरकर, अंगद सोगे यांची उपस्थिती होती. या मिरवणुकीला शहरातील महात्मा फुले चौकापासून प्रारंभ झाला. तेथून शिवाजी चौक, येलदरी रोड, नृसिंह चौक, दादा शरीफ चौक, मेन चौक, पोलीस स्टेशनसमोरुन घोषणा देत संत सावतामंदिर परिसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यशस्वीतेसाठी दत्ता काळे, गंगाधर गोरे, महादू काळे, गुलाब नाहतकर, दत्ता कटारे, मारोती काळे, सुभाष कटारे, सचिन साळवे, विठ्ठल होले, प्रकाश काळे, राहुल राऊत, प्रकाश लांडगे, कृष्णा इखे, जे.डी.कापुरे, गणेश काळे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीmusicसंगीतDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर