शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी विद्यापीठातील भरती वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:22 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनंतर कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याची माहिती माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनंतर कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याची माहिती माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने सध्या २०१४ मधील कृषी सहाय्यक पदवीधर, कृषी सहाय्यक पदविकाधारक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक गृहविज्ञान या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मूळात ही भरती प्रक्रियाच कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याची तक्रार विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य अजय गव्हाणे यांनी कुलगुरु डॉ.अशोक ढवन यांच्याकडे केली होती. या प्रक्रियेत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. शिवाय कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कृषी सहाय्यक पदवीधर पदासाठी जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना व मागास प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तांना जाणूनबुजून डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या अनुषंगाने दाखल याचिके अंतर्गत जाहिरातीला कायमची स्थगिती देण्यात आली होती. २६ आॅगस्ट २००९ च्या प्रकल्पग्रस्तांच्या जाहिरातीप्रमाणे जोपर्यंत भरती होणार नाही. तोपर्यंत ही स्थगिती दिली होती. यावर विद्यापीठाच्या पूनर्विचार याचिकेमध्ये न्यायालयाने २००९ च्या जाहिरातीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची पदभरती करावी, असे आदेशित केले असताना ते न करता २०१४ च्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु केली व लेखी परीक्षा घेतली. सदर जाहिरातीमध्ये प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण ५० टक्के असायला हवे होते. तसे न करता ५ टक्के आरक्षण ठेवले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा अवमान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.याच अनुषंगाने माजी आ.विजय गव्हाणे यांनीही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे भेटून निवेदन दिले होते. यावेळी त्यांनी शासनाच्या एससीबीसीचे १६ टक्के आरक्षण डावलून व न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची पायमल्ली करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी माजी आ.गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केली होती. संबंधित निवेदनावरच कृषीमंत्री पाटील यांनी कुलगुरुंच्या नावाने शेरा लिहून सदरील भरती प्रक्रियेस तातडीने स्थगिती देऊन कायद्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे नमूद केले असल्याचे गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तशी मूळ पत्रही त्यांनी कुलगुरु डॉ.ढवन यांना दिली असल्याचे सांगितले.दरम्यान, माजी आ.गव्हाणे यांनी सदरील भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगितले असले तरी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ