शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वर्षभरात ३९ कोटींचा कर वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:18 IST

जिल्ह्यात गौण खनिज, कोर्ट फी, मुद्रांक शुल्क, अकृषिक कर आदींच्या माध्यमातून शासनाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ३९ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही विक्रमी वसुली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात गौण खनिज, कोर्ट फी, मुद्रांक शुल्क, अकृषिक कर आदींच्या माध्यमातून शासनाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ३९ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही विक्रमी वसुली आहे.राज्याच्या सांख्यिकी विभागाने नुकतान जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवाल २०१८ प्रसिद्ध केला. या अहवालानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात शासनाच्या विविध विभागांनी तब्बल ३९ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. त्यामध्ये जमीन महसूल वाढीव संकीर्ण, जि.प., ग्रा.पं., पं.स. शेष, ईजीएस, शिक्षण, अकृषिक कर, सिटी सर्व्हे, वस्तीवाढ व नुझूल या माध्यमातून ४ कोटी ५० लाख १ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ कोटी ४७ लाख १८ हजार रुपये परभणी तालुक्यातून तर सर्वात कमी ११ लाख १५ हजार पालम तालुक्यातून वसूल करण्यात आले आहेत. गौण खनिज, मत्स्य, कोर्ट फी व मुद्रांक, बीबीडीआर, नोंदणी पत्र, महसुली, करमणूक, जाहिरात आदींच्या माध्यमातून यावर्षात तब्बल ३५ कोटी १० लाख १२ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५ कोटी २८ लाख ८० हजार रुपये परभणी तालुक्यातून तर सर्वात कमी म्हणजे २ कोटी २६ लाख २८ हजार रुपये जिंतूर तालुक्यातून वसूल करण्यात आले आहे. हीच स्थिती २०१६-१७ मध्ये वेगळी होती. यावर्षात एकूण १८ कोटी २८ लाख ९८ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला. त्यामध्ये ३ कोटी ८७ लाख २० हजार जमीन महसूल जि.प., पं.स. शेष आदींच्या माध्यमातून तर १४ कोटी ४२ लाख ७८ हजार रुपये गौण खनिज, खाणी, कोर्ट फी व मुद्रांक, करमणूक कर आदींच्या माध्यमातून वसूल करण्यात आले. २०१३-१४ मध्ये मात्र तब्बल ३४ कोटी ८९ लाख २३ हजार रुपये वसूल करण्यात आले होते. तर २०१४-१५ मध्ये सर्वात कमी म्हणजे २ कोटी ७२ लाख २० हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला होता. २०१५-१६ मध्ये एकूण २३ कोटी ३५ लाख ४२ हजार रुपयांचा जिल्ह्यातून कर वसूल करण्यात आला होता.उद्दिष्टाच्या ५० टक्के वसुली नाही२०१७-१८ या वर्षात प्रशासनाला एकूण १०१ कोटी ५० लाख ६५ हजार रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये जमीन महसूल, शेष, ईजीएस आदींचे ६ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५ कोटी ५० लाख रुपये वसूल झाले. गौण खनिज, कोर्ट फी व मुद्रांक शुल्क आदींचे ९४ कोटी ८० लाख ८७ हजारांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात या वर्षात ३५ कोटी १० लाख १२ हजार रुपयेच वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTaxकरRevenue Departmentमहसूल विभाग