शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

परभणी : चौदा कंत्राटदारांना दिले रंगरंगोटीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:17 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कामाचे तुकडे पाडून ३ लाखांची मर्यादा न ओलांडता मजूर सोसायट्यांवर मेहरनजर दाखविण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असून विद्यापीठातील इमारतींची रंगरंगोटी करण्यासाठी तब्बल १४ मजूर सोसायटींना ३० लाख रुपयांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कामाचे तुकडे पाडून ३ लाखांची मर्यादा न ओलांडता मजूर सोसायट्यांवर मेहरनजर दाखविण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असून विद्यापीठातील इमारतींची रंगरंगोटी करण्यासाठी तब्बल १४ मजूर सोसायटींना ३० लाख रुपयांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे.३ लाख रुपयांपुढील कामांच्या आॅनलाईन निविदा काढणे बंधनकारक असल्याने तसेच विद्यापीठाची कार्यकारी परिषद, बांधकाम समिती व महाराष्ट्र विद्या परिषद यांची परवानगी घ्यावी लागत असल्याने यातून पळवाट काढण्यासाठी ३ लाखांच्या आतच कामाचे तुकडे पाडून मर्जीतील मजूर सोसायट्यांना काम वाटपाचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून कृषी विद्यापीठात सुरु आहे. निविदांमध्ये स्पर्धा न होऊ देता अंदाजपत्रकाप्रमाणे कामे वाटप करुन विद्यापीठ प्रशासन नामनिराळे झाले आहे. हे करीत असताना शासनाचे नियम पायंदळी तुडविण्याचा निर्णय झाला असताना या प्रकरणी कारवाई मात्र झालेली नाही. विद्यापीठातील विविध इमारतींना रंग देण्यासाठी २९ लाख ९९ हजार ६७६ रुपयांची तरतूद होती. ही कामे एकाच कंत्राटदाराला दिली असती तर कामाच्या दर्जावरही नियंत्रण ठेवता आले असते. शिवाय आॅनलाईन निविदेतून कमी किंमतीमध्ये चांगली कामे करता आली असती; परंतु, विशिष्ट मजूर सोसायट्यांना सांभाळण्यासाठी आॅनलाईन निविदा न करता ३ लाख रूपयांच्या आतच १४ तुकडे करण्यात आले. त्यामध्ये कृषी अभियात्रिकी महाविद्यालयाच्या एका इमारतीच्या रंगरंगोटीचे ४ लाख ७६ हजार ७०२ रुपयांचे काम ३ कंत्राटदारांना देण्यात आले. सह्याद्री या वसतिगृहाच्या इमारतीच्या रंगरंगोटीचे २ लाख ८३ हजार ६९९ रुपयांचे काम दोन कंत्राटदारांना देण्यात आले. अन्नतंत्र महाविद्यालयाच्या इमारतीच्या रंगरंगोटीचे ५ लाख २९ हजार ६२५ रुपयांचे काम दोन कंत्राटदारांना वाटून देण्यात आले. याशिवाय मल:निस्सारण वाहिनी दुरुस्तीची ६ लाख ७१ हजार ४५३ रुपयांची कामे ३ कंत्राटदारांना देण्यात आली.चार इमारतींमधील खिडक्यांना अ‍ॅल्यूमिनियम सरकत्या खिडक्या बसविण्याचे ९ लाख ४९ हजार ९२७ रुपयांचे काम चार कंत्राटदारांना वाटून देण्यात आले. दोन इमारतींमध्ये स्टाईल्स फरशी बसविण्याचे ५ लाख २९ हजार ५३५ रुपयांचे काम दोन कंत्राटदारांना वाटून देण्यात आले. अशा प्रकारे ३ लाख रुपयांच्या कामाची मर्यादा न ओलांडता कामाचे तुकडे पाडण्यात आले. याशिवाय विद्यापीठातील वैद्यनाथ या मुलांच्या वसतिगृहाच्या ६ लाख ४८ हजार ७८९ रुपयांचे काम ३ कंत्राटदारांना वाटण्यात आले. नागनाथ वसतिगृहातील ९ लाख ९४ हजार ९०२ रुपयांची विविध कामे ४ कंत्राटदारांना वाटण्यात आली. सामाजिक विज्ञान महाविद्यालयातील ७ लाख ८९ हजार ६११ रुपयांची कामे तीन कंत्राटदारांना वाटण्यात आली. विद्यापीठातील इमारत क्रमांक ३ मधील निवासस्थान २ अ च्या दुरुस्तीचे ५ लाख ३४ हजार ८०८ रुपयांचे काम दोन कंत्राटदारांना वाटून देण्यात आले. अशा प्रकारे नियमबाह्यरित्या कामांचे तुकडे करुन एकीकडे विद्यापीठाला व दुसरीकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेलाही फसविण्याचा प्रकारही विद्यापीठातून घडला आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.आॅनलाईन ऐवजी पावती फाडून घेतले शुल्ककोणतेही शासकीय शुल्क स्वीकारत असताना ते आॅनलाईन स्वीकारावे, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्याच अनुषंगाने देशपातळीवर डिजीटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे. कृषी विद्यापीठात मात्र डिजीटल व्यवहारांना तिलांजली देऊन चक्क पावत्या फाडून निविदांचे शुल्क घेतले जाते. आॅनलाईन निविदा केल्या तर आॅनलाईन शुल्क जमा करावे लागते. येथे निविदाच आॅनलाईन होत नाहीत तर शुल्क तरी आॅनलाईन कसे घ्यायचे, या भावनेतून जुन्याच पद्धतीने पावती फाडण्याला अधिकाºयांकडून पसंती दर्शविली जात आहे. हा प्रकार सर्रासपणे चुकीचा असताना तो रोखण्याची तसदीही वरिष्ठांकडून घेतली जात नाही, हे विशेष होय.निविदांच्या स्पर्धांना विद्यापीठ प्रशासनाने दिला खोविविध कामे चांगल्या दर्जाची व कमी खर्चामध्ये करुन घेण्यासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, या करीता निविदा प्रक्रिया अवलंबिली जाते; परंतु, कृषी विद्यापीठात मात्र या प्रक्रियेला खो देऊन अंदाजपत्रकाप्रमाणे मजूर सोसायट्यांना कामे वाटप करण्यात आली. यामुळे विद्यापीठाचे नुकसान झाले असले तरी त्याबाबत विद्यापीठातीलच अधिकाºयांना काहीही वाटत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीuniversityविद्यापीठVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ