शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेली रामपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:05 IST

प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. सुपीक जमीन, गोदावरीच्या प्रवाहामुळे पाण्याची मुबलक सुविधा अशी नैसर्गिक सुबत्ता गाव परिसरात आहे. या गावाला पौराणिक महत्त्व प्राप्त झाले असून गावाच्या शिवारामध्ये प्रभू श्री रामचंद्राचे वास्तव्य असल्याचे दाखले पुराणात मिळतात. गावातील हनुमानाच्या मुख्य मंदिरासोबतच मोठा मारुती, नवरा हनुमान, दसरा हनुमान, शनी हनुमान अशी गावामध्ये पाच हनुमानाची मंदिरे आहेत तर परिसरातील शेतशिवारात सहा मंदिरे असून, या मंदिरामुळेच या गावाला बारा हनुमंताची रामपुरी, अशी ओळख निर्माण झाली, अशी माहिती कांता महाराज जोशी, नारायण पुजारी यांनी दिली. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमृता आणि पवित्रा या दोन नद्या या ठिकाणी गोदावरी नदीत मिसळतात. त्यामुळे नद्यांचा त्रिवेणी संगम येथे आहे. हनुमान मंदिराबरोबरच गावांमध्ये महादेव मंदिरांचीही शृंखला पाहावयास मिळते. त्यात स्वयंभू मूर्ती असलेले मल्लीकर्जून मंदिर, पापदंडेश्वर, खंडेश्वर, रामेश्वर, काशी विश्वेश्वर, खंडेश्वर, गोकर्णेश्वर, नर्मदेश्वर अशी महादेवाचे मंदिर या ठिकाणी आहेत. या सर्व मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुरातन मंदिरामुळे या गावाला मोठा पौराणिक वारसा निर्माण झाला आहे.अधिकाऱ्यांचे गाव म्हणूनही ओळख४परभणी शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर मानवत तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या रामपुरी या गावाला पौराणिक वारस्यामुळे मूळ ओळख असली तरी येथील गावकऱ्यांनी या गावाला अधिकाºयांचे गाव, अशी नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. गावातील युवकांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यातल्या विविध भागात प्रशासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.४येथील रहिवासी असलेले अनेकजण प्रशासनात ठिक ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या अधिकाºयांची गावाशी अजूनही बांधीलकी असून प्रत्येक महिन्यात ते या ठिकाणी येऊन सामाजिक उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे शासकीय नोकरीमध्ये दाखल होणाºया अधिकाºयांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यामुळेच या गावाला आता अधिकाºयांचे गाव म्हणूनही ओळख प्राप्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious Placesधार्मिक स्थळे