शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेल्वेची विकासकामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:51 IST

येथील रेल्वेस्थानकावरील विकासकामे संथगतीने सुरू असून, प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यापासून सुरू असलेले सरकता जीना उभारणीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. तसेच लोकेटरसह इतर कामांना मुहूर्तही लागत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावरील विकासकामे संथगतीने सुरू असून, प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यापासून सुरू असलेले सरकता जीना उभारणीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. तसेच लोकेटरसह इतर कामांना मुहूर्तही लागत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़परभणी हे नांदेड विभागातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून, दक्षिण-मध्य रेल्वेच्या आदर्श रेल्वे स्थानकामध्ये परभणीचा समावेश आहे़ वर्षभरापूर्वी या स्थानकावर सरकता जीना बसविण्यासासाठी साहित्यही उपलब्ध झाले होते. परंतु, रेल्वे प्रशासनाने हे साहित्य इतर ठिकाणी नेल्याने सरकत्या जीन्याचे काम रेंगाळले होते़ रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांचा दबाव वाढल्यानंतर साधारणत: दोन महिन्यापूर्वी सरकता जीना बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली़ पोलीस चौकीच्या समोरील दादºयावर हा जीना बसविला जात आहे़ मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे़ काम सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीही एका बाजुचा सरकता जीनाच पूर्ण झाला नाही़स्वच्छतागृहाचाही अभावप्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते़ अनेक वेळा रेल्वे गाड्याची वाट पाहत प्रवाशांना थांबावे लागते़ परंतु, या प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे़ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील अर्धा भार प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर टाकण्यात आला़ परंतु, त्या तुलनेत या प्लॅटफॉर्मवर सुविधा उपलब्ध केल्या नाहीत़कोच लोकेटर बसविण्याचे काम रखडलेप्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ औरंगाबाद, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे़ अनेक प्रवासी आरक्षण करून हा प्रवास करतात़ परंतु, कोच लोकेटर नसल्याने आरक्षित डबा नेमका कुठे येणार? याची माहिती प्रवाशांना मिळत नाही़ स्थानकावर अनाऊसिंग करून ही माहिती दिली जात असली तरी ती व्यवस्थित समजत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ रेल्वे गाडी स्थानकामध्ये दाखल झाल्यानंतर प्रवाशांना धावपळ करावी लागते़ यात अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़