शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : परीक्षा केंद्रासाठी राणीसावरगाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:38 IST

येथील जिल्हा परिषदेचे दहावीचे परीक्षा केंद्र विभाजन न करता कायम ठेवावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन केले

लोकमत न्यूज नेटवर्कराणीसावरगाव: येथील जिल्हा परिषदेचे दहावीचे परीक्षा केंद्र विभाजन न करता कायम ठेवावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन केले.राणीसावरगाव येथे जिल्हा परिषदेची प्रशाला आहे. अनेक वर्षांपासून दहावीचे परीक्षा केंद्र हे या प्रशालेमध्ये आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. असे असताना येथील जिल्हा परिषद प्रशालेचे परीक्षा केंद्राचे विभाजन करुन अन्य शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यालयाचे संमतीपत्रही घेतले नाही. जिल्ह्यातील कागदोपत्री चालणाºया शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र तयार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हा प्रशालेचे परीक्षा केंद्र कायम ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी शिक्षण मंडळाकडे केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बंद पाळण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.कृउबाचे संचालक ज्ञानेश्वर जाधव, ओंकार आंधळे, पं.स. सदस्य दत्ता जाधव, भूषण गळाकाटु, गणेश शिंदे, हंसराज जाधव, बंडू स्वामी, राहुल बनाटे, बाळू स्वामी, दत्ता जाधव, समाधान जाधव, केशव जाधव, सुरज जाधव, बसलिंग चलवदे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.