शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

परभणी : पूर्णा नदी झाली खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:58 IST

प्रशासनाने अवैध वाळू उपशावर कितीही निर्बंध लादले तरीही तालुक्यातील वझर, येसेगाव, निलज, अंबरवाडी या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली करडी नजर ढिली पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या वाळू उपशाने पूर्णा नदी खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : प्रशासनाने अवैध वाळू उपशावर कितीही निर्बंध लादले तरीही तालुक्यातील वझर, येसेगाव, निलज, अंबरवाडी या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली करडी नजर ढिली पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या वाळू उपशाने पूर्णा नदी खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात एकाही वाळू धक्याचा लिलाव झाला नाही. त्यामुळे एकीकडे नागरिकांना वाळू मिळत नाही. तर दुसरीकडे चोरटी वाळू वाहतूक करणारे तालुक्यातील २० ते २५ वाळूमाफिया रात्रीच्या वेळी वाळू चोरी करून वाहतूक खुलेआम करीत आहेत. वझर येथील वाळू घाट तालुक्यात सर्वात मोठा आहे. येथील वाळुही चांगल्या दर्जाची असल्याने त्यास मागणीही मोठी आहे.मात्र प्रशासनाने मागील सहा महिन्यांत केलेल्या कार्यवाहीमुळे वाळू चोरीला लगाम लागला होता; परंतुु, मागील दोन महिन्यांपासूून या घाटावरून ४ टिप्पर व ६ ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी वाळू उपसा करीत आहेत. विशेष म्हणजे ही वाळू नदीपात्रातून उपसा करून साठविली जाते. त्यानंतर तिची वाहतूक केली जाते. याच भागात वाळूचे ट्रॅक्टर धरल्यानंतर पोलिसांना मारहाण झाली होती. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरी सुरूच आहे. या भागात सहसा अधिकारी जात नाहीत. त्याचा फायदा हे वाळू माफिया घेत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक वाळूमाफियांची मोठी दादागिरी या भागात आहे.वझर प्रमाणे निलज धक्यावरूनही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे.येथे स्वत:च जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दोन वेळा कार्यवाही केली होती. तरीही येथून वाळू उपसा सुरूच आहे. या भागातून वाळू सेनगाव, रिसोड, हिंगोली या भागात जात आहे. दररोज ८ ते १० टिप्पर भल्या पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करतात.निलज येथून होणारी वाळू वाहतूक प्रशासन रोखू शकत नसल्याचे चित्र आहे.खबरे बनताहेत मालामाल४प्रशासनाच्या कार्यवाहीची भीती असल्याने वाळूमाफिया रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी रोजंदारीवर चौकीदार उभे करीत आहेत.४शिवाय प्रशासनातील एखाद्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून अधिकाºयाचे लोकेशन घेतले जात आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वझर व निलजकडे अशा व्यक्ती जास्त पहावयास मिळतात.रस्त्यावर वाळूचे ढिगारे४तालुक्यातील वझर, निलज प्रमाणे करपरा नदीतूनही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे.४येसेगाव येथून दररोज १० ते १५ ट्रॅक्टरचा वाळू उपसा केला जातो. तर अंबरवाडी येथील ओढ्यातूनही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.प्रशासन कार्यवाही करीत आहे. आमचे बारकाईने लक्ष आहे. मागील आठवड्यात ६ ते ८ ट्रॅक्टर पकडले असून आपण स्वत: याकडे लक्ष देऊन कार्यवाही करू.-सुरेश शेजूळ, तहसीलदार

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीsandवाळू