शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

परभणी : प्रात्यक्षिकातून मतदान यंत्राची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:42 IST

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील मतदान केंद्रांसह शाळा, महाविद्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान यंत्राची जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक मतदाराने ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटविषयी माहिती जाणून घ्यावी, असे अवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील मतदान केंद्रांसह शाळा, महाविद्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान यंत्राची जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक मतदाराने ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटविषयी माहिती जाणून घ्यावी, असे अवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने केले आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदाराने कोणत्या उमेदवारास मतदान केले हे व्हीव्हीपॅटवर सात सेकंद दिसणार असल्याने मतदारांनी कशाप्रकारे मतदान करावे, निवडणुकीत ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर कसा होणार आहे, याविषयी मतदारांना माहिती दिली जात आहे. १८ डिसेंबर ते २० जानेवारी या काळात तालुक्यातील मालेवाडी, वाघलगाव, गोपा, नरळद, इरळद, धारखेड, मुळी, नागठाणा, सुनेगाव, सायळा, खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळसावंगी, धारासूर, महातपुरी, महातपुरी तांडा, आनंदवाडी, शंकरवाडी, दत्तवाडी, शेंडगा, हरंगुळ, धनगरमोहा, उखळी खु., मानकादेवी, मरगळवाडी, भेंडेवाडी, टोकवाडी, सांगळेवाडी, मरगीळवाडी, वागदेवाडी, ढवळकेवाडी, गोदावरी तांडा, कौडगाव, धर्मनगरी, कासारवाडी, ईसाद, खंडाळी, बोथी, बोथी तांडा, वरवंटी, फुगनरवाडी, टाकळवाडी, कार्लेवाडी, घाटेवाडी, गौळवाडी, गौळवाडी तांडा, अरबुजवाडी, लिंबेवाडी, लिंबेवाडी तांडा, गुंजेगाव, घटांग्रा, घटांग्रा तांडा, अकोली, खादगाव, पोखर्णी वाळके, माखणी, सिरसम, डोंगरजवळा, खोकलेवाडी, चिलगरवाडी, सुप्पा खा., सुप्पा ज. कुंडगिरवाडी, पांगरी, बेलवाडी, बेलवाडी तांडा, शिवाजीनगर, दगडवाडी, पडेगाव, बनपिंपळा, मरडसगाव, विठ्ठलवाडी, मसनेरवाडी, इळेगाव, भांबरवाडी, दुस्सलगाव, रुमना, जवळा, राणीसावरगाव, कांगणेवाडी, उंबरवाडी, दामपुरी, निळानाईक तांडा, पिंपळदरी, सायबेटवाडी, बोर्डा, बडवणी, कातकरवाडी, डोंगरगाव, डोंगरपिंपळा, कोद्री, उंडेगाव, अंतरवेली, सेलमोहा, कड्याची वाडी, तांदुळवाडी, वाघदरी, आनंदवाडी, पिसेवाडी, झोला, पिंप्री, मसला आदी गावांत मतदार जागृती अभियान राबवून प्रत्येक मतदान केंद्रांवर तसेच शाळा, महाविद्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले जाणार आहे.आपण केलेले मतदान व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदाराला पाहता येणार असल्याने गावागावांत होणाऱ्या या मतदान प्रक्रियेची माहिती समजून घेण्यासाठी मतदारांनी जनजागृती अभियानात सहभाग नोंदवून आपल्या शंका कुशंकांचे निरसन करून घ्यावे, असे अवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे, सहायक मतदान नोंदणी अधिकारी तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार यशवंतराव गजभारे, लिपिक किरण साखरे यांनी केले आहे.निवडणूक विभागाच्या वतीने १८ डिसेंबर ते २० जानेवारी या काळात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक