शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आरोग्य सेवा पुरविताना कर्मचारी मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:30 IST

मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील मनपाच्या रूग्णालयात रूग्णांची गर्दी होत असून आलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवितांना कर्मचाºयांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे़

चंद्रमुनी बलखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील मनपाच्या रूग्णालयात रूग्णांची गर्दी होत असून आलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवितांना कर्मचाºयांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे़परभणी महानगर पालिकेची शहरामध्ये पाच रूग्णालये आहेत़ यामध्ये एका युनानी दवाखान्यासह इतर नागरी दवाखाने आहेत़ मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वातारणात बदल झाला आहे़ बुधवारी परभणी शहराचे तापमान ६ अंश सेल्सीअसवर पोहचले होते़ यामध्ये गुरूवारी आणखी घट झाली. वातारणातील बदलामुळे रूग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे़ या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील मनपाच्या चार रूग्णालयांची ‘लोकमत’ने पाहणी केली़ सकाळी ११़५० वाजता शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील दवाखान्यास भेट दिली असता दवाखान्याच्या तीन खोल्यात वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते़ एका खोलीमध्ये ८ ते ९ महिला रूग्ण नाव नोंदणी करतांना दिसून आले़ तर महिला डॉक्टर रूग्णांची तपासणी करीत होत्या़ एका रूग्णास औषधी, गोळया आहेत का? अशी विचारणा केली असता औषधी मिळाली असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दुपारी १२़०५ वाजता लोकमान्य नगरातील ज्ञानेश्वर पाटीजवळील युनानी दवाखान्यास भेट दिली असता हा दवाखाना बंद असल्याचे दिसून आले़ परिसरातील एका दुकानदारास दवाखाना का बंद आहे, याची विचारणा केली असता दवाखाना आताच बंद झाला आहे़, अशी माहिती दिली़ आज शुक्रवार असल्याने लवकर बंद झाला असावा, असे या दुकानदाराने सांगितले. यानंतर जायकवाडी वसाहत परिसरातील कल्याण मंडपम् शेजारील मनपाच्या मुख्य दवाखान्यास दुपारी १२़ १५ वाजता भेट दिली़ यावेळी दवाखान्यात लसीकरण शिबीर सुरू असल्याचे दिसून आले़ लहान बालकांना घेऊन मातांनी गर्दी केली होती़ येथे डॉ़ कान्हेकर व डॉ़ सावंत हे बालकांना लस देत होते़ कर्मचाºयास औषधी साठा आहे का? अशी विचारणा केली असता, औषधी मूबलक असल्याचे सांगितले. याबाबत रूग्णांकडे विचारणा केली असता, मी आताच नोंदणी केली आहे़ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर औषधीचे सांगता येईल, असे त्याने सांगितले़ यानंतर दुपारी १२़३० वाजता खानापूर फाटा परिसरातील पिंगळी रोडवरील दवाखान्यास भेट दिली असता येथेही रूग्णांची गर्दी दिसून आली़ एका खोलीमध्ये लहान बालकांचे लसीकरण सुरू होते़ तर ७ ते ८ रूग्ण बाहेर थांबले असल्याचे दिसून आले़धुळीचा करावा लागतो सामना४शहरातील खंडोबा बाजार परिसर, पिंगळी रोेडवरील दवाखाने मुख्य रस्त्याच्या बाजुला आहेत. रस्त्याची दूरवस्था झाल्याने वाहनांमुळे प्रचंड धूळ निर्माण होत आहे. ही धूळ बाजुला असलेल्या दवाखान्यामध्ये जात आहे. दवाखान्याला केवळ कापडी पडदे आहेत. वाºयामुळे पडदे उडून धूळ दवाखान्यात जात आहे. याचा त्रास रुग्णांसह आरोग्य कर्मचाºयांनाही सहन करावा लागत आहे. अशीच स्थिती लोकमान्यनगरातील युनानी दवाखान्याची आहे. हा दवाखानाही रस्त्यालगत आहे. येथेही वाहनामुळे धूळ उडून दवाखान्यात जात आहे.