शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :योग्य मशागत केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:02 IST

जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणीही केली आहे.

संडे स्पेशल मुलाखतलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणीही केली आहे. मशागत करताना योग्य काळजी घेतली तर पिकांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे भविष्यात पिकांवर होणारा किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पेरणीपूर्व मशागत करून घ्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी केले आहे.जमिनीची मशागत करताना काय काळजी घ्यावी?मशागतीसाठी संपूर्ण जमीन नांगरून घेणे आवश्यक आहे. ही नांगरलेली जमीन कडक उन्हात तापू द्यावी. जमिनीतील सगळा काडीकचरा वेचून बाहेर काढावा. असे केल्याने जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या किडी नष्ट होतील. चांगल्या पद्धतीने वखरणी करावी आणि त्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करणे आवश्यक आहे. या बाबीचे शेतकºयांनी काटेकोर पालन करावे.बोंड अळीचा प्रादुर्भावअसल्यास काय काळजी घ्यावी?परभणी जिल्ह्यात मागील खरीप हंगामात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी झाला होता. अशावेळी ज्या शेतात गुलाबी बोंड आळी आढळली होती, अशा शेतकºयांनी कापसाच्या पºहाट्या रचून ठेवू नयेत. शेताची खोल नांगरणी करावी. त्यातील संपूर्ण काडी कचरा उचलून टाकावा, शेतातील त्याचप्रमाणे धुºयावरील पºहााट्या जाळून नष्ट कराव्यात. कारण थोडाही पाऊस झाला तरी सुप्त अवस्थेत असलेल्या बोंडअळीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी सर्व पºहाट्या काळजीपूर्वक नष्ट करणे गरजेचे आहे. तसे केल्यानंतर शेतीतील उत्पादन वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.खरीप हंगामापूर्वी मशागत कशी करावी? मशागत करताना काय काळजी घ्यावी? नेमकी कोणत्या पद्धतीने मशागत करावी आणि शास्त्रशुद्ध मशागत केल्याने काय फायदे होतात? या प्रश्नांवर वनामकृवितील कीटकशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर यांच्याशी साधलेला संवाद....बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे का?पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी वखरणी करून पेरणी करावी. तूर, मूग, उडीद यासारखे कडधान्य घ्यावयाचे असल्यास त्यापूर्वी रायझोबियम जिवाणू खत अधिक स्फुरद या विरघळविणाºया जिवाणू खताची २५0 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यानंतर सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी