शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : प्रलंबित प्रश्नांसाठी प्राध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:35 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़ जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून, त्यासाठी ८ डिसेंबरपासून आंदोलन केले जात आहे़ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी ८ डिसेंबरपासून राज्यभर तीव्र आंदोलन केले जात आहे़ शासनाने मागील पाच बैठकांमध्ये निर्णय घेऊन केवळ आश्वासने दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़ जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून, त्यासाठी ८ डिसेंबरपासून आंदोलन केले जात आहे़कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी ८ डिसेंबरपासून राज्यभर तीव्र आंदोलन केले जात आहे़ शासनाने मागील पाच बैठकांमध्ये निर्णय घेऊन केवळ आश्वासने दिली़सरकारने अजूनही आपला शब्द पाळला नसल्याने जुक्टा संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ संघटनेचे अध्यक्ष विजय घोडके यांनी शासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली़दरम्यान, प्राध्यापकांच्या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा़ विजय घोडके, सरचिटणीस प्रा़ अरुणकुमार लेमाडे, प्रा़ डॉ़ पंडीत नवघरे, प्रा़ आप्पा डहाळे, प्रा़ अरुण भांगे, डॉ़ जे़ यू़ पाटील, प्रा़ सी़यू़ देशमुख आदींसह प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते़३२ मागण्यांचे निवेदननोव्हेंबर २०१५ नंतर सेवेत रुजू झालेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायदा विना अनुदान तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना अनुदान द्यावे, २०१२-१३ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे, २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देणे व त्यांच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद करावी, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानीत करावा, संच मान्यतेतील सर्व त्रुटी दूर करून प्रचलित निकषानुसार संच मान्यता करावी, २३ आॅक्टोबरचा वरिष्ठ व निवड श्रेणीचा बेकायदेशीर आदेश रद्द करावा, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करावे आदी ३२ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे़