शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : इंटरनेटअभावी मिळेनात दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:31 IST

गावपातळीवर सर्व शासकीय कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरु करण्यात आले; परंतु पाथरी तालुक्यात मात्र आॅप्टीकल फायबरची यंत्रणा कार्यान्वित होऊनही केवळ इंटरनेटअभावी विविध कागदपत्रे मिळण्यापासून ग्रामस्थांना वंचित रहावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी: गावपातळीवर सर्व शासकीय कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरु करण्यात आले; परंतु पाथरी तालुक्यात मात्र आॅप्टीकल फायबरची यंत्रणा कार्यान्वित होऊनही केवळ इंटरनेटअभावी विविध कागदपत्रे मिळण्यापासून ग्रामस्थांना वंचित रहावे लागत आहे.केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतींना विविध अधिकार दिले आहेत. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्याअधारे ग्रामपंचायतींना विकासकामासाठी निर्देश दिले जात आहेत. तसेच गावपातळीवर सर्व शासकीय कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी प्रत्येक गावात राज्य शासनाने ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत पाथरी तालुक्यात ग्रामपंचायतनिहाय संगणक चालकाच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. ग्रामपंचायतींना आॅप्टीकल फायबर ब्रॉडबँडसाठी बीएसएनएलकडून स्वतंत्र लाईन पुरवठा करण्यात आला. दोन वर्षांपासून हे काम सुरु आहे. सहा महिन्यांपूर्वी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली.मात्र काही दिवस इंटरनेट सेवा सुरु झाल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने ही सेवा बंद पडली आहे. प्रत्यके ग्रामपंचायींमध्ये आॅप्टीकल फायबरचे सांगडे दिसून येत आहेत. पाथरी तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींसाठी ३८ डाटा आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे.इंटरनेटसेवाच ठप्प पडल्याने ग्रामस्थांनाही कोणतेही कागदपत्रे ग्रामस्थरावर मिळेणासे झाले आहेत. विशेष म्हणजे ब्रॉडबँड इंटरनेटसेवा बंद असल्याने गावात मिळणारे दाखले आता तालुक्याच्या ठिकाणी जावून काढावे लागत आहेत. याचा नाहक भुर्दंड ग्रामस्थांना बसत आहे. लाखो रुपये खर्च करुनही सुरु केलेली सेवा काही दिवसांतच बंद पडली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.सहा महिन्यांपासून वेतनही मिळेना...ग्रामपंचायतींना प्राप्त होणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींच्या संगणकचालकांना मानधन दिले जाते. ग्रामपंचायत त्यांच्याकडे उपलब्ध रक्कम जिल्हास्तरावर आपले सरकार सेवा केंद्राकडे पाठविते. मात्र तालुक्यातील ग्रामपंचायती त्यांच्याकडील रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार संगणक चालकांतून होत आहे. या संदर्भात या संघटनेचे अध्यक्ष संतोष नखाते, आनंद बडवणे, दीपक लिंबेकर, अनिल वाघमारे आदींनी वेतन देण्यात यावे, अशी मागणीही केली. दरम्यान, तालुक्यात किती ग्रामपंचायतीकडे ब्रॉडबँड सेवा सुरु आहेत? किती ठिकाणी बंद आहेत? याचा ग्रामसेवकांकडून अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतर बीएसएनएलकडे पत्रव्यवहार करुन सेवा सुरु केली जाई, अशी माहिती गटविकास अधिकारी बी. टी. बायस यांनी दिली.