शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सालगड्यांचे भाव सव्वालाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:14 IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातून गोदावरी व वाण नदी वाहते. तसेच मुदगल बंधारा व माजलगाव कालव्याचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे; परंतु, अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेती करणे अवघड झाले आहे. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे १० एकरच्या वर शेती आहे, तो शेतकरी शेती कसण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेऊन वर्षभर शेती करीत असतो़ मागील वर्षी सालगड्यांचे भाव ७५ ते ८५ हजार रुपयांपर्यंत होते; परंतु, यावर्षी सालगाड्यांच्या भावात घसघशीत वाढ झाली आहे़ ९० हजार ते सव्वालाख रुपयांपर्यंत साल मागितले जात आहे. नापिकी व दुष्काळातून शेतकरी अद्याप बाहेर आला नाही. त्यातच सालगड्यांचे भाव हे सव्वालाखापर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंताग्रस्त झाले आहेत़यावर्षी रबी हंगाम झाला नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला़ गुढी पाडव्यापासून शेतावर काम करणाºया सालगड्याचे साल ठरविण्याची परंपरा रुढ आहे़ या परंपरेनुसार शनिवारी ग्रामीण भागात ठिक ठिकाणी सालगाड्यांचे साल ठरविण्यात आले़तब्बल सहा महिन्यांपासून शेतीमध्ये काम उपलब्ध नसल्याने पुढील वर्षीच्या हंगामात सालगड्यांचे भाव कमी होतील, अशी अपेक्षा होती़ शेतकरीही आर्थिक कचाट्यात असल्याने यातून तडजोड निघेल, असाही सूर होता़ परंतु, सालाने शेती करण्यासाठी सालगडीच मिळत नसल्याने भाव वधारले आहेत़ ज्या शेतकऱ्यांकडे पूर्वीचे सालगडी होते, ते कामाच्या शोधात शहरी भागात गेले आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागात सालगडी ठरविताना शेतकºयांना कसरत करावी लागली़ अनेक ठिकाणी शेतकºयांनी जास्तीचे पैसे मोजून शेतीचे साल निश्चित केले आहे़ सालगाड्यांचा भाव तर वाढलाच आहे़ तसेच नगदी रक्कम देण्याबरोबरच धान्याचीही मागणी सालगड्याकडून होत असल्याने शेतकºयांसमोर पुढील हंगामातील उत्पन्नाचेही संकट उभे टाकले आहे़शेती कसण्यास : बटईची पद्धत४खरीप हंगामाला जुलै महिन्यापासून सुरुवात होत असली तरी त्याचे नियोजन गुढी पाडव्याच्या दिवशीच केले जाते़ वर्षभर शेती करण्यासाठी मजूर, सालगड्यांचे भाव ठरविले जातात़ स्वत: घरी शेती करताना सालगडी ठेवला जातो़ परंतु, शेती करणाºया मजुरांची मानसिकता शहरी भागात काम करण्याची असल्याने आणि सालगडी ठरविणे परवडत नसल्याने अनेकांनी बटईने शेती देण्याचा पर्याय निवडला आहे़ यामध्ये शेती करीत असताना झालेल्या उत्पन्नात ठराविक हिस्सा देऊन समोरच्या व्यक्तीला शेती बटाईने दिली जाते़ यात शेतकºयांना तोटा होण्याची शक्यता कमी असल्याने आणि इतर अडचणीही दूर होत असल्याने बटाईचा पर्याय निवडला जात आहे़शेतीत काम करण्यास सध्या कोणी पुढे येत नाही. त्यामुळे मजूरच मिळत नाहीत. वर्षभर शेती कसण्यासाठी सालगडी मिळणे मुश्कील बनले आहे. त्यातून सालगड्यांचे भाव सव्वालाखावर पोहचले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी