शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पीक विम्यासाठी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:52 IST

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी शासनाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सुरुवातीला पीक विमा भरण्यासाठी शेतकरी फारसे आॅनलाईन केंद्राकडे फिरकले नाहीत. मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पेरणी केलेल्या पिकांची उगवण झाली असून, या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता परिस्थिती बिकट बनणार असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे.मागील काही दिवसांपासून तलाठी संपर्क कार्यालये आणि आॅनलाईन केंदे्र फुलून गेली आहेत.दिवसभर आॅनलाईन केंद्रावर थांबूनही अनेकांचे अर्ज भरले जात नाहीत. अशा शेतकºयांकडून अर्ज भरून घेण्यासाठी केंद्र चालकांकडून एका अर्जासाठी १०० ते १५० रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. यासाठी कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे एकीकडे शेतकºयांची लूट होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.सातबारा काढण्यासाठी तलाठ्यांकडे गर्दी४पीक विमा भरण्यासाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक आहे. मात्र सेतू सुविधा केंद्रावर आता आॅनलाईन सातबारा देणे बंद करण्यात आल्याने तलाठ्यांकडूनच आॅनलाईन सातबारा घ्याव्या लागत आहे. विशेष म्हणजे एका तलाठ्याकडे चार ते पाच गावे येत असल्याने सातबारा काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. परिणामी सातबारा वेळेवर मिळत नाहीत.४या सातबारा वेळेवर मिळत नसल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर २४ जुलैपर्यंत सर्वच तलाठ्यांनी मुख्यालयी हजर राहून कागदपत्रे वितरित करावीत, बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे आता तरी शेतकºयांना वेळेत सातबारा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा