शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :पिंगळगड नाल्यावरील पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:45 IST

गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारलेल्या पुलाला खालील बाजुने तडे गेले असून, अनेक ठिकाणी गज उघडे पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारलेल्या पुलाला खालील बाजुने तडे गेले असून, अनेक ठिकाणी गज उघडे पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़परभणी-गंगाखेड या राज्य महामार्गावर परभणी शहराजवळून पिंपगळगड नाला वाहतो़ या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे़ सध्या या पुलाची दुरवस्था झाली असून, वाहनधारकांसाठी हा पूल धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ या पुलावरून एखादे वाहन पुढे गेल्यास पाच फुट अंतरापर्यंत हादरे बसत आहेत़ परभणी ते गंगाखेड हा राज्य महामार्ग असून, या मार्गावर वाहनांची संख्याही मोठी आहे़ लातूर, गंगाखेड, परळी आणि कर्नाटकामध्ये जाणारी वाहतूक याच मार्गावरून केली जाते़ दररोज हजारो वाहने या पुलावरून धावतात़दररोजच्या वाहनांचा भार सहन करण्याची क्षमता या पुलात सध्या उपलब्ध असली तरी पुलाच्या स्लॅबचे गज उघडे पडल्याने आगामी काळात धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.दगडी खांबावर स्लॅब टाकून हा पूल उभारण्यात आला आहे़ पुलाखालून स्लॅबचे निरीक्षण केले असता, अनेक ठिकाणी गज उघडे पडले आहेत़ तर काही भागात पुलाचा स्लॅब एका बाजुला झुकल्याचे दिसत आहे़ त्यामुळे या पुलावरुन वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे़ त्यामुळे वेळीच दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.तेव्हा सार्वजनिक बाधंकाम विभागाने तज्ज्ञामार्फत या पुलाची पाहणी करून तांत्रिक दृष्टीकोणातून पुलाची डागडुजी करण्यासाठी पावले उचलावित, अशी मागणी होत आहे़पुलावरील कठडे गायबपिंगळगड नाल्याच्या पुलावरील दोन्ही बाजुंची कठडे सहा महिन्यांपासून गायब झाले आहेत़ या पुलाला लोखंडी कठडे बसविले होते़ परंतु, सद्यस्थितीत दोन्ही बाजुला कठडे गायब आहेत़ गंगाखेडकडे जाताना उजव्या बाजुचे कठडे तर पूर्णत: गायब झाले असून, रात्री-अपरात्री भरधाव जाणाऱ्या वाहनधारकांना पूल लक्षात आला नाही तर अपघातही होण्याची शक्यता आहे़ तेव्हा या पुलाला दोन्ही बाजुंनी पक्के कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाparabhaniपरभणीTrafficवाहतूक कोंडी