शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

परभणी: विधानसभेचे चित्र वंचित बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:16 IST

आलुतेदार, बलुतेदार, भटके, विमुक्तांना सत्तेत पाठविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे़ या सर्व लहान घटकांनी खंबीरपणे आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्यास विधानसभेचे चित्र निश्चित बदलेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता गोविंद दळवी यांनी व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आलुतेदार, बलुतेदार, भटके, विमुक्तांना सत्तेत पाठविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे़ या सर्व लहान घटकांनी खंबीरपणे आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्यास विधानसभेचे चित्र निश्चित बदलेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता गोविंद दळवी यांनी व्यक्त केला़२७ आॅगस्ट रोजी सखा गार्डन येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा पार पडला़ या प्रसंगी दळवी बोलत होते़ अध्यक्षस्थानी आलमगीर खान तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सचिव भीमराव दळे, जिल्हाध्यक्ष धर्मराज चव्हाण, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ इम्तीयाज खान, मारोतराव पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती़ इम्तीयाज खान यांनी प्रास्तविकात बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका विशद केली़या प्रसंगी इंजि़ चंदासिंग, गजानन मरगळ, मधुकर काळे, शेळके महाराज, अंगद सोगे, दिलीप मोरे, सिद्धार्थ भाग्यवंत, प्रा़ के़डी़ चव्हाण, सुभाष पांचाळ, कृष्णा राऊत, यज्ञकांत वाघ, भगवान देवरे, लखन सौंदरमल, वंदना जोंधळे, अनिता वाघमारे, अखिल भाई, अमीत राठोड, सुमीत जाधव आदी उपस्थित होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराज चव्हाण म्हणाले, येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सर्व भटके, विमुक्त, वंचितांची मजबूत मूठ बांधल्यास चारही विधानसभा हाती घेऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला़या मेळाव्यात इंद्रायणी मित्र मंडळाचे अध्यक्ष किशन गव्हाणे, वडी येथील ग्रामपंचायत सदस्य बळीराम तायडे, शिकलकरी समाजाचे भोलासिंग बरीयामसिंग टाक, धनगर समाजातील ज्ञानेश्वर बोबडे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला़ राहुल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले़ चंदासिंग यांनी आभार मानले़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019