शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ६६४ कि.मी.ची पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:39 IST

अवयवदान ही चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून ८ ज्येष्ठ नागरिकांनी औरंगाबाद ते तुळजापूर अशी ६६४ कि.मी.अंतराची पदयात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा जालना जिल्ह्यात असून २ डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात अवयवदानाची जनजागृती केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अवयवदान ही चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून ८ ज्येष्ठ नागरिकांनी औरंगाबाद ते तुळजापूर अशी ६६४ कि.मी.अंतराची पदयात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा जालना जिल्ह्यात असून २ डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात अवयवदानाची जनजागृती केली जाणार आहे.अवयवदान ही काळाची गरज असून या संदर्भात राज्यभरात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत असल्या तरी हा विषय अजूनही दुर्लक्षित आहे. परंपरेच्या जोखडात अडकलेला समाज अवयवदानाला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेने अवयवदानाच्या चळवळीसाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात या चळवळीची जनजागृती करण्यासाठी ६७ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली १६ नोव्हेंबरपासून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. ही पदयात्रा औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमार्गे २४ डिसेंबर रोजी तुळजापूर येथे पोहचणार आहे. दररोज २० कि.मी. अंतर पायी चालत ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. परभणी येथे २ डिसेंबर रोजी ही पदयात्रा पोहचणार असून विविध सामाजिक संस्था, आरोग्य संस्था व ग्रामीण भागात अवयवदानाविषयी जनजागृती केली जाणार आहे. या पदयात्रेत दयानंद मठपती (लातूर), प्रियदर्शन बापट (नाशिक), चंद्रशेखर देशपांडे (नवी मुंबई), शैलेश देशपांडे, अविनाश कुलकर्णी, सुनील देशपांडे यांचा समावेश आहे.दोन पदयात्रा झाल्या पूर्णद फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेने यापूर्वीही अवयवदानाच्या जनजागृतीसाठी दोन पदयात्रा पूर्ण केल्या आहेत. २५ नोव्हेंबर ते २१ जानेवारी २०१७ या काळात नाशिक ते नागपूर अशी १३४० कि.मी.ची पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम पवार यांच्या नेतृत्वाखाली २३ फेब्रुवारी रोजी केईएम हॉस्पिटल मुंबई येथून सुरु झालेली पदयात्रा ८५० अंतर कि.मी. पार करुन १५ एप्रिल २०१८ रोजी मडगाव (गोवा) येथे पोहचली. आता तिसरी पदयात्रा काढली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीOrgan donationअवयव दान