शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

परभणी : नऊ टक्क्यांनी घटली पीककर्ज वाटपाची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:04 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र केवळ २१.४६ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र केवळ २१.४६ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले.जिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप व रबी हंगामात उसणवारी करुन बी बियाणांची पेरणी केली; परंतु, अपुºया पावसाअभावी पिकांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील तीनही वर्षात पिकांवर केलेला खर्च उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले. त्यामुळे २०१९-२० च्या खरीप हंगामात शेतकºयांना पेरणी करण्यासाठी व बी बियाणे खरेदीसाठी पैशाची गरज होती.जिल्हा प्रशासनाने शेतकºयांची अवस्था लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे खरीप हंगाम सुरू होईपर्यंत प्रत्येक लाभार्थी शेतकºयांना पीक कर्ज मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती.मात्र खरीप हंगाम संपत आला तरीही बँकांनी दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये २१.४६ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यामध्येही व्यवसायिक बँकांनी ११ हजार ४७६ शेतकºयांना १०४ कोटी १८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करून केवळ १०.१२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी २०६६ शेतकºयांना ३२ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करीत ४२.६१ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ११ हजार ४५७ शेतकºयांना ७८ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ३९.११ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३३ हजार २८७ शेतकºयांना १०१ कोटी ४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ६१.६ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे खरीप हंगाम संपला तरीही अद्यापपर्यंत एकाही बँकेने पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. विशेष म्हणजे गतवर्षीच्या खरीप हंगामात ३० सप्टेंबरपर्यंत ३०.५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना केवळ २१.४६ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यावर्षी ९ टक्क्यांनी पीक कर्ज वाटप करण्याची गती कमी झाल्याचे दिसून येत आहे.रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्टच्रबी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण केले नसतानाच दुसरीकडे रबी हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटप करताना आगामी काळात मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.च्पीक कर्ज वाटप करताना बँकांकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे कारण पुढे करून शेतकºयांना पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत. त्यामुुळे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी याकडे लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.च्जिल्ह्यातील बँकांनी लाभार्थी शेतकºयांना वेळेत पीक कर्ज वाटप करण्यासाठी स्वतंत्र काऊंटर सुरु करून गती वाढवावी. ज्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना रबी हंगामात पीक कर्ज मिळून बी बियाणे खरेदीसाठी मदत मिळेल, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकCrop Loanपीक कर्ज