शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : झरी सरपंचाविरुद्ध चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:16 IST

तालुक्यातील झरी येथील सरपंच अश्विनी बालाजी देशमुख यांच्या विरूद्ध ग्रा़पं़ अधिनियम १९५८/३९ (१) नुसार एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी जि़प़मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील झरी येथील सरपंच अश्विनी बालाजी देशमुख यांच्या विरूद्ध ग्रा़पं़ अधिनियम १९५८/३९ (१) नुसार एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी जि़प़मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत़या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, झरी येथील विठ्ठल रावसाहेब देशमुख हे सर्वे नंबर २ गट क्रमांक ९ मधील १ हेक्टर ८५ आरचे मालक व ताबेदार असून, त्यांनी झरी ग्रा़पं़मध्ये मालकी हक्काबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ५० व ५३ नुसार प्रकरण न्यायप्रविष्ठ होते़ सदरचे प्रकरण परभणी जिल्हाधिकाºयांनी १५ आॅक्टोबर २०१८ रोजी निकाली काढले असून, सदरील निकालाच्या अनुषंगाने अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात आला व संचिका बंद करण्यात आली़ त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक २७ आॅगस्ट २०१० नुसार कलम २५० मध्ये नमूद केलेल्या ९० दिवसांचा कालावधी संपण्या अगोदरच परिपत्रकाचे उल्लंघन करून बेकायदेशीरित्या कार्यवाही केली आहे़ त्यामुळे सरपंच अश्विनी बालाजी देशमुख यांच्याविरूद्ध कार्यवाही करण्यास आदेशित करावे, अशी विनंती अर्जदार विठ्ठल देशमुख यांनी केली हाती़ त्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९८५ चे कलम ३९ (१) मधील तरतुदीनुसार जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्वत: चौकशी करावी व सरपंच आणि संबंधित व्यक्तींना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देऊन एक महिन्याच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल कार्यालयास सादर करावा, असेही या संदर्भातील आदेशात अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळ यांनी म्हटले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच