शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : केबीसी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:18 IST

केबीसी कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून ४० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्या़ डी़ व्ही़ कश्यप यांनी ५ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केबीसी कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून ४० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्या़ डी़ व्ही़ कश्यप यांनी ५ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहेत़या प्रकरणाची अ‍ॅड़ जितेंद्र घुगे यांनी दिलेली माहिती अशी, परभणी येथील डॉ़ आंबेडकरनगर येथे राहणारे महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद नंद यांनी केबीसी कंपनीत स्वत:च्या नावे ३१ लाख रुपये गुंतविले होते़ तसेच पत्नीच्या नावे जवळपास ९ लाख रुपये गुंतविले होते़ केबीसी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या पैशांचा परतावा केला नाही़ आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर नंद यांनी कोतवाली पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली़ मात्र आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला नाही़त्यामुळे त्यांनी अ‍ॅड़ जितेंद्र एऩ घुगे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली़ याचिकाकर्त्याने आपली आयुष्यभराची कमाई व निवृत्तीनंतर मिळालेली भविष्यनिर्वाहची रक्कम पूर्णत: केबीसी कंपनीमध्ये गुंतविली असून, या प्रकरणात याचिकाकर्त्याची घोर फसवणूक झाली आहे़ तेव्हा केबीसी कंपनी व भाऊसाहेब चव्हाण याच्या मालमत्तेतून ही रक्कम वसूल होणे आवश्यक आहे़ त्यासाठी कलम ३ व ४ महाराष्ट्र ठेवीदारांची गुंतवणूक संरक्षण कायदा १९९९ प्रमाणे आरोपींविरूद्ध कारवाई करावी, असा युक्तीवाद अ‍ॅड़ घुगे यांनी केला़ हा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्या़ डी़व्ही़ कश्यप यांनी केबीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब चव्हाण, संचालक आरती चव्हाण, संदीप जगदाळे, सागर पाटील, सुनील आहेर यांच्याविरूद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलीस ठाण्याला दिले आहेत़