शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आरोग्य संस्थेत आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:45 IST

प्रसूतीनंतर लगेच बाळाला आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्ह्यात सुरू झाली असून, या अंतर्गत शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले जन्म प्रमाणपत्र पालकांना देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रसूतीनंतर लगेच बाळाला आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्ह्यात सुरू झाली असून, या अंतर्गत शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले जन्म प्रमाणपत्र पालकांना देण्यात आले आहे.आरोग्य संस्थांमध्ये जन्म झालेल्या बाळांना जन्म प्रमाणपत्र देणे तसेच आरोग्य संस्थेत उपचार घेत असताना मृत्यू पावल्यानंतर त्याच ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र देण्याची योजना अंमलात आणली जात आहे. त्याअंतर्गत परभणी जिल्ह्यात सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच दैठणा येथे सध्या ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बाळाला पहिले आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. टप्प्याटप्प्याने ही सुविधा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. देशमुख यांनी दिली. यापुढे आरोग्य संस्थेमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बाळाचे जन्म प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे आरोग्य संस्थेत उपचार घेताना मृत्यू झाल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र आरोग्य संस्थेतून वितरित केले जाणार आहे. याकामी शासनामार्फत स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. याबाबत तालुकास्तरावर सांख्यिकी अधिकारी राजेंद्र दुसाने यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी