शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी :विजेच्या धक्क्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:34 IST

विजेच्या खांबावर काम करीत असताना शॉक लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाजवळील शेतात घडली़ या घटनेत एक जण जखमी झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (जि. परभणी) : विजेच्या खांबावर काम करीत असताना शॉक लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाजवळील शेतात घडली़ या घटनेत एक जण जखमी झाला आहे़सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील ज्ञानेश्वर नारायण नवल (२७) व सोपान रामभाऊ पाठमोरे (कावी ता़ जिंतूर) हे दोघे ४ फेब्रुवारी रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उत्तमराव माने यांच्या शेतात वीज खांबावरून तार ओढण्याचे काम करीत होते़ याच वेळी परिसरातून गेलेल्या ११ केव्ही वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्याने दोघेही जमिनीवर कोसळले़ या घटनेत ज्ञानेश्वर नारायण नवल (२७) यांचा जागीच मृत्यू झाला असून, सोपान पाठमोरे हे जखमी झाले आहेत़पाथरी शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत ही घटना घडली़ या प्रकरणी जखमी सोपान पाठमोरे यांनी दिलेल्या खबरीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद झाली आहे़ पोलीस निरीक्षक व्ही़व्ही़ श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़