शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांची संख्या अठरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:05 IST

विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांचा समावेश आहे.आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. दुचाकी वाहनांचा दुरुपयोग करुन आचारसंहितेचा भंग केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले असून, विनापरवाना रॅली काढणे, विनापरवाना सभा घेणे, विनापरवाना प्रचार केल्याप्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत आणि दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ७ गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील चारही मतदार संघाच्या तुलनेत इतर जिंतूर मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात अवैध दारू विक्रीच्या विरोधातही निवडणूक विभागाच्या पथकांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत या पथकांनी ३ लाख २१ हजार ७७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात १५ हजार १८४ रुपयांची देशी दारू, १ लाख ४० हजार रुपयांची बुलेट मोटारसायकल, २० हजारांची दुचाकी, जिंतूर येथेच देशी दारू व दोन दुचाकी असा १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल निवडणूक विभागाच्या स्थायी पथकाने जप्त केला आहे. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध पथकांची स्थापना केली आहे. यामध्ये एसएसटी पथकामार्फत वाहनांची तपासणी केली जाते. परभणीसह जिंतूर, सेलू, पाथरी, गंगाखेड या शहरांमध्ये मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट उभारुन तपासणी केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019