शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आता प्रशासकीय इमारतीतून न्यायदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:09 IST

येथील रेल्वेस्थानक परिसरातील न्यायालयाची निजामकालीन इमारत धोकादायक झाल्याने या न्यायालयातील १२ न्यायालये आणि त्या अंतर्गत कार्यालये मंगळवारी प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाली असून, आता या ठिकाणावरूनच न्यायदानाचे काम केले जाणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरातील न्यायालयाची निजामकालीन इमारत धोकादायक झाल्याने या न्यायालयातील १२ न्यायालये आणि त्या अंतर्गत कार्यालये मंगळवारी प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाली असून, आता या ठिकाणावरूनच न्यायदानाचे काम केले जाणार आहेत़येथील रेल्वेस्टेशन परिसरात जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध न्यायालयांचे कामकाज चालते. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, मुख्य न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर, न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग अशा १२ न्यायालयांचे कामकाज चालणाऱ्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे या इमारती जमीनदोस्त करुन नवीन इमारतींची उभारणी या ठिकाणी करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर, मुख्य न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर, न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांची १२ न्यायालये आणि त्यांची संलग्न कार्यालये २९ एप्रिल रोजी प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यात आली़ जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाचे कामकाज मात्र पूर्वीच्याच ठिकाणी सुरु राहणार आहे़प्रशासकीय इमारत परिसरातील नवीन बांधकाम केलेल्या इमारतीत दोन मोठ्या हॉलमध्ये न्यायालयांचे कामकाज केले जाणार आहे़ याच दरम्यान, रेल्वेस्थानक परिसरातील जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नव्याने इमारत बांधकाम करण्यात येणार आहे़ हे काम पूर्ण होईपर्यंत बाराही न्यायालयांचे कामकाज प्रशासकीय इमारतीच्या परिसरातूनच होणार आहे़ जिल्हाभरातील विविध प्रकरणांतील सुनावणी आणि न्यायदानाचे काम प्रशासकीय इमारतीतून होणार असल्याने वकील आणि पक्षकार मंडळींना त्यांच्या न्यायालयीन कामकाजासाठी प्रशासकीय इमारतीतच संपर्क साधावा लागणार आहे़शतकीय परंपरेला लागणार पूर्णविराम४रेल्वेस्थानक परिसरात न्यायालयाची जुनी इमारत साधारणत: १०१ वर्षांपूर्वीची आहे़ निजाम सरकारच्या बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम केले आहे़४दारुल- ए-इन्साफ या नावाने परिचित असलेल्या या इमारतीचे संपूण बांधकाम चुना आणि विटांच्या सहाय्याने करण्यात आले होते़४ही इमारत धोकादायक झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने शंभर वर्षांपूर्वीची ही इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय