शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

परभणी : नवीन तलाठी सज्जे लाल फितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:02 IST

महसूल प्रशासनाचे काम सोयीचे व्हावे आणि ग्रामस्थांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयाची पूनर्रचना करुन जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालये वाढविण्यात आले खरे; परंतु, या शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करण्यासाठी पदनिर्मिती होत नसल्याने महसूलच्या कामकाजातील अडथळे कायम असून ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महसूल प्रशासनाचे काम सोयीचे व्हावे आणि ग्रामस्थांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयाची पूनर्रचना करुन जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालये वाढविण्यात आले खरे; परंतु, या शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करण्यासाठी पदनिर्मिती होत नसल्याने महसूलच्या कामकाजातील अडथळे कायम असून ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.२०१८ पूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये २३९ तलाठी सज्जे आणि ३९ मंडळ कार्यालय अस्तित्वात होती. महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी हे कर्मचारी प्रशासन आणि ग्रामस्थांमधील दुवा म्हणून काम करतात. गावपातळीवरील अनेक महत्वाची कामे या दोन पदांच्या माध्यमातून केली जातात. सद्यस्थितीला जिल्ह्यातील एका तलाठी सज्जाअंतर्गत ५ ते ६ गावांचा कारभार चालविला जातो. एका गावात साधारणत: १ हजार कुटुंब संख्या असेल तर ५ ते ६ हजार कुटुंबांचे जमिनीचे, शेती संदर्भातील व्यवहाराचा भार एकाच तलाठ्यावर येऊ न पडतो. परिणामी कामकाजात शिथीलता येऊन त्याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतो. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पीक विमा काढण्याचे काम सुरु आहे. पीक विम्यासाठी तलाठ्यांकडून सात-बारा उतारा घ्यावी लागत असे. एका सज्जामध्ये अनेक गावांचा समावेश असल्याने शेतकऱ्यांना सातबारासाठी धावपळ करावी लागत आहे. एक-एक दिवस तलाठी कार्यालयात काढावा लागत आहे. एक वर्षापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयांची पूनर्रचना झाली. त्यात जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालयांची भर पडली. १० जानेवारी २०१८ रोजी वाढीव तलाठी सज्जे आणि मंडळांची राजपत्रात नोंद घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता ३१५ तलाठी सज्जे आणि ५२ महसूल मंडळे निर्माण झाली आहेत. या नवीन तलाठी सज्जांची निर्मिती झाली असली तरी प्रत्यक्षात तलाठी सज्जांसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी कोणत्या तालुक्यात किती तलाठी पद भरावे लागतात, या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे; परंतु, पदनिर्मितीची प्रक्रिया झाली नसल्याने तलाठी सज्जे, मंडळ कार्यालये लालफितीत अडकले आहेत.पुनर्रचना : वाढलेली मंडळ कार्यालय, तलाठी सज्जे४परभणी जिल्ह्यात मंडळ कार्यालय आणि तलाठी सज्जाची पुनर्रचना झाली. त्यात परभणी तालुक्यात ४७ तलाठी सज्जे होते. ही संख्या आता ५५ एवढी झाली आहे. तर ८ मंडळ कार्यालयांमध्ये टाकळी कुंभकर्ण या नवीन मंडळ कार्यालयाची भर पडली आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये पूर्वी ४ मंडळे होती. आता मंडळांची संख्या ५ झाली असून पिंपळदरी या नवीन मंडळ कार्यालयाची भर पडली आहे. तसेच तलाठी सज्जांची संख्या २३ वरुन ३२ एवढी झाली आहे. पूर्णा तालुक्यात ५ मंडळ कार्यालयांऐवजी ६ मंडळ कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. कावलगाव या नवीन मंडळाची तालुक्यात भर पडली आहे. तर २८ तलाठी सज्जाऐवजी आता ३६ तलाठी सज्जे या तालुक्यात स्थापन झाली आहेत.४ पालम तालुक्यामध्ये पेठशिवणी, रावराजूर या दोन नवीन मंडळाची निर्मिती करण्यात आली असून १९ तलाठी सज्जांमध्ये ८ नवीन सज्जांची भर पडली आहे. पाथरी तालुक्यात कासापुरी हे नवीन मंडळ कार्यालय तयार केल्याने मंडळांची संख्या ४ झाली असून तलाठी सज्जाची संख्या १८ वरुन २६ वर पोहोचली आहे. मानवत तालुक्यात पूर्वी ३ मंडळे होती. त्यात ताडबोरगाव आणि रामपुरी या दोन मंडळांची भर पडली आहे. २१ तलाठी सज्जाऐवजी आता २९ तलाठी सज्जे निर्माण करण्यात आली आहेत. सोनपेठ तालुक्यात पूर्वी दोनच मंडळे होती. नव्या पुनर्रचनेत शेळगाव आणि वडगाव या दोन मंडळांची निर्मिती झाली असून तलाठी सज्जे १५ हून २३ झाले आहेत.४सेलू तालुक्यात पाच मंडळे होती. या तालुक्यात मोरेगाव या नवीन मंडळाची निर्मिती झाली आहे. तसेच तलाठी सज्जांची संख्या २९ वरुन ३७ एवढी झाली आहे.४जिंतूर तालुक्यात दुधगाव आणि वाघी धानोरा या दोन नवीन मंडळाची निर्मिती झाली असून ३८ तलाठी सज्जाऐवजी आता ४८ तलाठी सज्जाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंडळ कार्यालयांची संख्या ३९ वरुन ५२ एवढी झाली असून २३९ तलाठी सज्जांची संख्या ३१५ एवढी झाली आहे.कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न४जुन्या पदसंख्येनुसार परभणी जिल्ह्यात तलाठ्यांची २३९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३२ पदे रिक्त असून अनेक तलाठ्यांना इतर तलाठी सज्जांचा पदभार देऊन कारभार चालवला जात आहे. मंडळ अधिकाºयांचीही ३९ पैकी ३ पदे रिक्त आहेत.४त्यामुळे नवीन पदनिर्मिती तर सोडाच. उपलब्ध पदेही परिपूर्णपणे कार्यरत नसल्याने महसूल विभागाला कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन पदनिर्मितीबरोबरच जुनी पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग